Amruta Khanvilkar esakal
Premier

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरला शिक्षणाची ओढ; म्हणाली, "आपण वर्षभर काम करत असतो पण..."

Amruta Khanvilkar: लुटेरे वेब सीरिजनंतर आता अमृताने तिला पुढे काय करायचंय? याबद्दल प्रेक्षकांना एक छोटी हिंट दिली आहे.

priyanka kulkarni

Amruta Khanvilkar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिनं हिंदी सिनेसृष्टीत देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. तिनं 'राझी', 'सत्यमेव जयते' आणि 'मलंग' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आता तिची लुटेरे ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजमधील तिनं साकारलेली "अविका " ही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. लुटेरे वेब सीरिजनंतर आता अमृताने तिला पुढे काय करायचंय? याबद्दल प्रेक्षकांना एक छोटी हिंट दिली आहे. ही खास गोष्ट नक्की काय आहे? हे बघायला सगळेच उत्सुक आहेत.

'लुटेरे' मधील अमृताच्या अभिनयाचं कौतुक होतंय. प्रत्येक कलाकाराला अभिनायच्या पलिकडे जाऊन आपण काहीतरी वेगळं करावं असं नक्कीच वाटून जात आणि असंच काही अमृताच्या बाबतीत घडतंय! अमृता सध्या "लुटेरे" चं प्रमोशन करत आहे. अश्याच एका प्रमोशन दरम्यान अमृताने तिला आयुष्यात अजून काहीतरी खास करायचं आहे याबद्दल सांगितल.

काय म्हणाली अमृता?

शिक्षणाबद्दल सांगताना अमृता म्हणते, "अभिनय नवनवीन भूमिका प्रोजेक्ट्स सगळंच होत राहणार आहे पण मला अभिनयाच्या सोबतीने मास्टर्स सुद्धा करायचं आहे. मास्टर्स इन लिटरेचर किंवा इन फायनस हे अजून ठरवलं नाही पण मास्टर्स करण्याची माझी इच्छा आहे. आपण वर्षभर काम करत असतो पण स्वतः हासाठी काहीतरी करावं म्हणून मला मास्टर्स करण्याची खूप इच्छा आहे"

अमृताचे आगामी प्रोजेक्ट्स

अमृता आगामी काळात अनेक हिंदी आणि मराठी प्रोजेक्ट्स मध्ये दर्जेदार भूमिका करणार आहे. "कलावती " , " ललिता बाबर "पठ्ठे बाबूराव" या सारख्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार तर आहे पण आता लुटेरेनंतर अमृता तिचं उच्च शिक्षण पूर्ण करणार का ? हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT