anil kapoor  sakal
Premier

Anil Kapoor: बेर्डेजी म्हणजे खूप मस्त माणूस... अनिल कपूर यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण, म्हणाले- त्यांच्यामुळे मी

Anil kapoor Shared Memory With Laxmikant Berde: लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर यांनी एका मुलाखतीत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण सांगितली आहे.

Payal Naik

बॉलिवूडचे सदाबहार अभिनेते अनिल कपूर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांनी आपल्या अभिनयासोबतच आपल्या फिटनेसने चाहत्यांना अवाक केलं. 'तेजाब' 'परिंदा', 'नायक' यांसारख्या चित्रपटात झळकलेले अनिल कपूर सध्या 'बिग बॉस ओटीटी ३' चं सूत्रसंचालन करताना दिसत आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल भाष्य केलं आहे. लक्ष्मीकांत हे अतिशय मोकळ्या मनाचे होते असं म्हणत त्यांनी प्रेक्षकांच्या लाडक्या लक्ष्याचं कौतुक केलं आहे. सोबतच केवळ त्यांच्यामुळे मी मराठी चित्रपटात काम करायला तयार झालो असं त्यांनी सांगितलं आहे.

लक्ष्मीकांत यांच्याबद्दल बोलताना अनिल हे भावुक झाले होते. त्यांच्याबद्दल बोलताना अनिल म्हणाले, 'लक्ष्मीकांत बेर्डेजी खूप मस्त माणूस होते. त्यांच्यासोबत मी 'बेटा' या चित्रपटात काम केलेलं. त्यांच्यासोबत काम करायला एक वेगळी मजा आली. त्यांचा स्वभाव खूप छान होता. एकदा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मला फोन केला. ‘हमाल दे धमाल' हा मराठी सिनेमा ते करत होते. या सिनेमात मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांना लगेच होकार कळवला. 'हमाल दे धमाल' सुपरहिट झाला. सिल्व्हर ज्युबिली झाला. माझा पहिलाच मराठी चित्रपट आणि तो ही सिल्व्हर ज्युबिली झाला. हे भाग्य मला लक्ष्मीकांत बेर्डे आणि या सिनेमामुळे मिळालं.'

पुढे ते म्हणाले, 'हमाल दे धमाल' हा सिनेमा जेव्हा मी स्वतः बघितला तेव्हा मला खूप मजा आली. मराठीतला हाच माझा फेव्हरेट सिनेमा आहे. त्यामध्ये मी काम केलं म्हणून तो माझा आवडता सिनेमा आहे असं नाहीये. तर, लक्ष्मीकांत बेर्डें यांच्यासोबत मी पहिल्यांदा मराठीमध्ये काम केलं म्हणून तो ,माझा आवडता सिनेमा आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDA vs SLA Test: ऋतुराज गायकवाड, देवदत्तने संधी गमावली; साई सुदर्शनची सेंच्युरी, तर ध्रुव जुरेल, शेख राशीदची दमदार फिफ्टी

Pachod Rain : दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाची दमदार हजेरी; शेतशिवार गजबजले, बियाण्यांच्या दुकानांत वाढली गर्दी

Vaibhav Sooryavanshi: १५ वर्षीय वैभवबाबत राहुल द्रविडचं मोठं विधान; म्हणाला, तुम्ही कोणत्याही मुलाला...

Video: 'असा' रचला केतनच्या खुनाचा कट; सिया अन् चेतनचा कॅफेतला व्हिडीओ आला, हातात हात देऊन बसले अन् केलं प्लॅनिंग

INDW vs BANW: करो वा मरो सामन्यात टीम इंडियाची कसोटी; T20 WC मध्ये बांगलादेशविरुद्ध उतरले मैदानात

SCROLL FOR NEXT