Anime in India eSakal
Premier

Anime in India : अ‍ॅनिमे फॅन्ससाठी मे महिना ठरतोय लकी! थिएटरला रिलीज होणार दोन मूव्हीज; कार्टून नेटवर्कवर आलं 'वन पीस'

PVR ने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे पासून देशभरातील कित्येक सिनेमागृहांमध्ये 'दि बॉय अँड दि हेरॉन' हा चित्रपट रिलीज होईल.

Sudesh

Anime Movies releasing in India : भारतातील अ‍ॅनिमे फॅन्ससाठी मे महिना हा अगदीच लकी ठरताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच कार्टून नेटवर्कवर जगप्रसिद्ध 'वन पीस' ही अ‍ॅनिमे सीरीज लाँच झाली होती. आता ऑस्कर पुरस्कार प्राप्त अ‍ॅनिमे चित्रपट 'दि बॉय अँड दि हेरॉन' हादेखील थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. (One Piece on Cartoon Network)

हायाओ मियाझाकी (Miyazaki) या दिग्गज दिग्दर्शकाचा शेवटचा चित्रपट असं बोलल्या जाणाऱ्या 'दि बॉय अँड दि हेरॉन' (The Boy and The Heron) या चित्रपटाने यंदाच्या ऑस्कर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं होतं. गिब्ली स्टुडिओजचा हा चित्रपट भारतात कधी रिलीज होतो याची गेल्या कित्येक महिन्यांपासून फॅन्स वाट पाहत होते. अखेर 10 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

PVR ने दिलेल्या माहितीनुसार, 10 मे पासून देशभरातील कित्येक सिनेमागृहांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. ओरिजिनल जपानी आणि इंग्लिश डब अशा दोन भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे. पुण्यामध्ये सिटी प्राईड कोथरूड, फिनिक्स मॉल, आयनॉक्स चिंचवड, पीव्हीआर फिनिक्स मार्केटसिटी, कुमार पॅसिफिक, आयनॉक्स बंड गार्डन, आयनॉक्स रॉयल हेरिटेज मॉल, अ‍ॅमेनोरा टाऊन सेंटर, वेस्टएंड मॉल, कोपा पुणे अशा ठिकाणी हा चित्रपट उपलब्ध असेल. (The boy And the heron India release date)

'हायक्यू' मूव्ही देखील होणार प्रदर्शित

हायक्यू या प्रसिद्ध अ‍ॅनिमे सीरीजचा नवा चित्रपट 'Haikyu : The Dumpster Battle' हादेखील भारतात प्रदर्शित होणार आहे. पीव्हीआरने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन याबाबत माहिती दिली आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात जेव्हा Demon Slayer हा अ‍ॅनिमे मूव्ही रिलीज झाला होता, तेव्हाच भारतातील कित्येक हायक्यू फॅन्स नाराज झाले होते. पीव्हीआरने डीमन स्लेयर सोबतच हायक्यूचा चित्रपट देखील रिलीज करायला हवा होता अशी मागणी फॅन्सनी केली होती. (Haikyu movie India release)

अखेर पीव्हीआरने आता हायक्यू चित्रपटाची घोषणा केली आहे. कंपनीने अद्याप याची रिलीज डेट जाहीर केली नसली; तरी मीडिया रिपोर्ट्सनुसार 31 मे रोजी हा चित्रपट भारतात रिलीज केला जाऊ शकतो. यामुळेच मे महिना हा अ‍ॅनिमे फॅन्ससाठी पर्वणी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT