Ankita Lokhande esakal
Premier

Ankita Lokhande: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात यमुनाबाईंची भूमिका साकारण्यासाठी अंकितानं किती घेतलं मानधन? जाणून घ्या

Ankita Lokhande: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटासाठी अंकितानं किती मानधन घेतलं आहे? याबाबत नुकताच या चित्रपटाच्या निर्मित्यांनी खुलासा केला आहे.

priyanka kulkarni

Ankita Lokhande: अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) 'स्वातंत्र्य वीर सावरकर' (Swatantra Veer savarkar) हा चित्रपट 22 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडेने महत्वाची भूमिका साकारली आहे. अंकितानं या चित्रपटात सावरकरांच्या पत्नी यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे. तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटासाठी अंकितानं किती मानधन घेतलं आहे? याबाबत नुकताच या चित्रपटाच्या निर्मित्यांनी खुलासा केला आहे.

अंकिता लोखंडे ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत असते. 'पवित्र रिश्ता' या शोमधील अर्चना, 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' मधील झलकारी बाई या अंकिताच्या भूमिकांचे प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलं. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटामध्ये तिनं यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे.

चित्रपटासाठी अंकितानं एक रुपयाही घेतला नाही

एका मुलाखतीत निर्माते संदीप म्हणाले, 'आमच्यासारखे निर्मात्यांना किंवा एकता कपूर, कंगना किंवा कमल जैन यांना एखाद्या कलाकाराची किती क्षमता काय आहे हे माहीत आहे. म्हणूनच आम्ही अंकितासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेऊन येत असतो. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटासाठी अंकितानं एक रुपयाही घेतला नसल्याचे निर्मात्यानी सांगितलं.

चित्रपटासाठी पैसे का घेतले नाहीत असा प्रश्न एका मुलाखतीत अंकिताला विचारण्यात आला. त्याबद्दल ती म्हणाली,"संदीप माझा खूप चांगला मित्र आहे. तो चित्रपट घेऊन माझ्याकडे आला होता. चित्रपटाच्या बजेटबद्दल तो आधीच चिंतेत होता. म्हणून मी त्याला सपोर्ट करण्याचे ठरवलं."

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाची स्टार कास्ट

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटात रणदीप हुड्डा, अंकिता लोखंडे, अमित सियाल यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, रणदीप हुड्डा आणि योगेश राहर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT