Bollywood actor Annu Kapoor shares his emotional final wish, expressing deep reflections on life and legacy.

 

esakal

Premier

Annu Kapoor Final Wish : अन्नू कपूर यांनी सांगितली अंतिम इच्छा, म्हणाले ‘’त्या दिवशी दिवाळी, ईद...’’

Bollywood Actor Annu Kapoor : अन्नू कपूर यांनी असरानी यांना भावनिक श्रद्धांजली वाहताना त्यांची शेवटची इच्छा जनतेसमोर मांडली आहे.

Mayur Ratnaparkhe

Bollywood actor Annu Kapoor shares his heartfelt final wish: ज्येष्ठ बॉलीवूड विनोदी कलाकार आणि अभिनेते असरानी, ​​यांचे दिवाळीतच निधन झाले आहे. यामुळे जवळपास तीन पिढ्यांना हसवणारा विनोदी कलाकार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. तर, अन्नू कपूर यांनी असरानी यांना भावनिक श्रद्धांजली वाहताना त्यांची शेवटची इच्छा जनतेसमोर मांडली आहे.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले, "त्यांच्या(आसरानी) आत्म्याला शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो... यात शंका नाही की ते एक उत्तम अभिनेता होते... मी त्यांना शेवटचे २० मार्च २०२३ रोजी 'नॉन स्टॉप धमाल'च्या सेटवर पाहिले होते... पण मला माहित नव्हते की ही त्यांची माझी शेवटची भेट असेल... आता मला ते माझ्या डायरीत लिहून ठेवावे लागेल."

अन्नू कपूर यांची शेवटची इच्छा काय? -

अन्नू कपूर पुढे म्हणाले, "त्यांच्या शेवटच्या इच्छेने मलाही प्रेरणा दिली... जेव्हा मला दुनिया नावाच्या या हॉटेलमधून बाहेर पडण्याची वेळ येते आणि ती तारीख आणि वेळ राष्ट्रीय सुट्टीशी जुळते... १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी... किंवा इतर कोणताही सण... दिवाळी... होळी... ईद... तेव्हा माझे अंतिम संस्कार खासगीरित्या केले पाहिजेत. मी कोणालाही त्रास देऊ इच्छित नाही आणि मला या जगात ओझे म्हणून जगायचे नाही."

असरानी यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकाकुल झाली आहे. असरानी यांची इच्छा होती की त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्याही थाटामाटात आणि दिखाव्याशिवाय व्हावेत आणि त्यांच्या कुटुंबाने तेच केले. त्यांच्या कुटुंबाने त्यांचे अंत्यसंस्कार केल्यानंतरच असरानी यांच्या निधनाची बातमी समोर आली. चित्रपटसृष्टीतील सदस्यांनाही त्यांचे अंत्यदर्शन घेता आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil : रुग्णवाहिका आणि औषध खरेदीत प्रचंड भ्रष्टाचार, सतेज पाटलांचा कोणावर रोख

Rohit Sharma: 'आज फेअरवेल मॅच होती!', गौतम गंभीरच्या कमेंटवर रोहितने काय दिली रिअॅक्शन? पाहा Viral Video

Virginity Test: संतापजनक! आधी कौमार्य चाचणी करा, नंतरच प्रवेश... मदरशाकडून सातवीतील विद्यार्थिनीकडे प्रमाणपत्राची मागणी

Indian Railways Smart Toilet : ट्रेनमधील शौचालये फक्त ५६ सेकंदात स्वच्छ होणार! नवीन तंत्रज्ञान काय? जाणून घ्या...

Bhagvad Gita Lessons in Marathi: दुसऱ्यांच्या 'परफेक्शन'च्या मागे धावू नका; तुमचा स्वत:चा मार्गच आहे चांगला : भगवद् गीतेतील शिकवण

SCROLL FOR NEXT