anushka sharma talks about bollywood industry Esakal
Premier

Anushka Sharma : "इंडस्ट्रीत लोक तुमचं यश पाहून तुमच्याशी मैत्री करतात"; अनुष्काने सांगितला तिचा अनुभव

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा इंडस्ट्रीतील अनुभव एका मुलाखतीत शेअर केलाय. काय म्हणाली अनुष्का जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या उत्तम अभिनयाने कमी कालावधीतच स्वतःचा चाहतावर्ग कमावला आहे. तिने तिच्या करिअरमध्ये आजवर वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आज म्हणजे १ मेला अनुष्काचा वाढदिवस आहे. या ३६ वर्षीय अभिनेत्रीने आजवर अशी यशाची शिखरं गाठली आहेत जिथे अजून इतर अभिनेत्री पोहोचू शकल्या नाहीयेत. बबली आणि बेधडक स्वभावामुळे प्रसिद्ध असलेली अनुष्का खऱ्या आयुष्यात लोकांशी लगेच नाती जोडत नाही. काय आहे यामागचं कारण जाणून घेऊया.

अनुष्काने काही वर्षांपूर्वी झी मीडियाला मुलाखत दिली होती. यावेळी तिने खुलासा केला कि, ती लोकांशी लगेच मैत्री करत नाही. यामागचं कारण सांगताना ती म्हणाली,"मी लोकांशी भावनिक संबंध जोडत नाही किंवा लगेच मैत्री करत नाही. याचा अर्थ असा नाही कि मी लहानपणापासूनच अशीच होते. पण या इंडस्ट्रीत आल्यावर मी हे शिकले आहे. कारण, मी लोकांना बदलताना पाहिलंय. मला किती यश मिळतंय याच्या मोजमापावर त्यांनी माझ्याशी नातं ठेवलं आहे आणि हे सगळेचजण करतात."

इतकंच नाही तर अनुष्का तिच्या वैयक्तिक आयुष्यावर फार कमी वेळा बोलताना दिसते. ती त्यावर कधीच चर्चा करत नाही. इतकंच नाही तर ती फक्त तिच्या मित्रांशी सुद्धा फोनवर, मेसेजवर कामापुरतंच बोलते, ती तिचं काम पूर्ण करून निघून जाते असं तिची मैत्रीण आणि अभिनेत्री कतरीना कैफने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

अनुष्का आणि साक्षी आहेत शाळेतील मैत्रिणी

अनुष्का आणि साक्षी शाळेतील मैत्रिणी आहेत. साक्षी आणि अनुष्का आसाममध्ये एकाच शाळेत शिकत होत्या. काही काळाने अनुष्काच्या वडिलांची बदली दुसऱ्या शहरात झाली. जेव्हा क्रिकेट सामन्यादरम्यान अनुष्का आणि साक्षीची भेट झाली तेव्हा त्यांना गप्पांमध्ये त्या दोघी एकाच वर्गात होत्या हे कळलं. काही काळाने अनुष्काला त्यांचा एक फोटोही मिळाला ज्यात साक्षीने परीचे कपडे घातले असून अनुष्काने घागरा-चोळी घातली आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत होता.

अनुष्काने नुकताच तिचा मुलगा अकायला जन्म दिला. ती आता तिच्या दोन्ही मुलांसोबत मुंबईत परतली असून ती जास्तीत जास्त वेळ तिच्या मुलांसोबत स्पेंड करते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT