Rohit Parshuram's Daughter's B'day Esakal
Premier

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची..' फेम अर्जुनच्या आयुष्यातील खरी लेडी सिंबा पाहिली का ? ; व्हिडीओची होतेय चर्चा

Rohit Parshuram's Daughter First Birthday Celebration : 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेता रोहित परशुरामने लेकीचा वाढदिवस थाटात साजरा केला.

सकाळ डिजिटल टीम

Rohit Parshuram : झी मराठीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही प्रेक्षकांची लाडकी मालिका. या मालिकेतील सिंबा आणि शहनशाह अर्जुनची जोडी अनेकांना पसंत पडतेय. पण सध्या मालिकेतील अर्जुनचा एक रिअल लाईफ व्हिडीओ चर्चेत आहे. अर्जुनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रोहित परशुरामने त्याच्या लेकीचा पहिला वाढदिवस थाटात साजरा केला.

लेकीच्या वाढदिवसाचा थाट

रोहितची लेक रुईला नुकतंच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त रोहितने मित्रपरिवार आणि कुटूंबासमवेत लेकीचा पहिला वाढदिवस थाटात साजरा केला. सोशल मीडियावर रोहितने लेकीच्या वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. यावेळी रुईने पिंक रंगाचा सुंदर फ्रॉक घातला होता आणि ती खूप खुशही दिसत होती. तर रोहित आणि त्याच्या पत्नीनेही वेस्टर्न कपडे घातले होते. तिच्या वाढदिवसाला त्यांचा संपूर्ण परिवार आणि मित्रमंडळी उपस्थित होती आणि सगळ्यांनी रुईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

रोहितने या व्हिडिओला "आमचं बाळ एक वर्षाचं झालं" असं कॅप्शन दिलं आहे. त्याने पहिल्यांदाच सोशल मीडियावर रुईचा व्हिडीओ शेअर केला आहे. या आधी त्याईनं शेअर केलेल्या फोटोमध्ये रुईचा चेहरा लपवला होता. त्याने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत रुईवर शुभेच्छांचा वर्षाव केला. रोहितची पत्नी पूजा ही सुद्धा अभिनेत्री असून तिने काही काळ अभिनयातून ब्रेक घेतला आहे.

सध्या रोहित अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सध्या मालिकेत अप्पी आणि अर्जुनचा मुलगा अमोल आता मोठा झाला असून त्याच्यामुळे पुन्हा एकदा अप्पी आणि अर्जुन समोरासमोर आल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर अर्जुनच्या वहिनीने अर्जुन आणि अप्पीचा घटस्फोट घडवून आणल्याचं सत्यही सगळ्यांसमोर आलं आहे. अमोल साठी आता अप्पी आणि अर्जुन एकत्र येणार का हे आता मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. साईराज केंद्रे या मालिकेत साकारत असलेली अमोलची भूमिका सगळ्यांना आवडते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT