Premier

Aranmanai 4 Trailer Out: हॉरर आणि कॉमेडीचा तडका! तमन्नाच्या 'अरनमनई 4' चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Aranmanai 4 Trailer Out: अरनमनई या चित्रपटात तमन्ना हटके अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

priyanka kulkarni

Aranmanai 4 Trailer: अरनमनई 4 (Aranmanai 4) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खास अनुभव देणार आहे यात शंका नाही. हॉरर-कॉमेडी असलेला हा नवीन चित्रपट तमन्ना भाटियाची (Tamannaah Bhatia) वेगळी बाजू दाखवून देणार आहे. तमन्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तिचा हटके अंदाज बघायला मिळत आहे.

अरनमनई 4 या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पॅन इंडिया स्टार तमन्ना भाटियाच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

'अरनमनई 4' ची स्टार कास्ट

अरनमनई 4 चित्रपटाचे दिग्दर्शन सुंदर सी. आणि खुशबू सुंदर यांनी अवनी सिनेमॅक्सच्या बॅनरखाली केले आहे. या चित्रपटात सुंदर, राशी खन्ना, संतोष प्रताप आणि आणखी काही प्रमुख भूमिका आहेत.

पाहा ट्रेलर:

तमन्नाचे आगामी चित्रपट

'अरनमनई 4' या चित्रपटाच्या व्यतिरिक्त तमन्नाचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तमन्ना लवकरच जॉन अब्राहमच्या 'वेद' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या ॲक्शन थ्रिलर चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला ज्यामध्ये जॉन अब्राहम हा ऑन ॲक्शन मोडमध्ये दिसला. हा चित्रपट 12 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तमन्ना ही तेलगूमधील 'ओडेला 2' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सध्या तमन्ना या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तमन्ना व्यतिरिक्त या चित्रपटात हेबा पटेल आणि वशिष्ठ एन. सिम्हाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

माझ्या प्रेमाला... होणाऱ्या नवऱ्याने प्राजक्ताला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला-

Video: तेनु काला चश्मा...! योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? कातिल स्टेप्स् पाहून थक्क व्हाल

Weekly Numerology Forecast : साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य! अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक सांगणार नशिबाबद्दल खास गोष्टी!

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

SCROLL FOR NEXT