Popular playback singer Arijit Singh, whose retirement announcement has shocked fans and the Bollywood music industry.

 

esakal

Premier

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

Arijit Singh Decision: सोशल मीडियावर पोस्ट करून स्वत:च दिली आहे माहिती, जाणून घ्या नेमकं काय म्हटलंय पोस्टमध्ये?

Mayur Ratnaparkhe

Arijit Singh Announces Retirement from Playback Singing : मनोरंजन क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारण, कोट्यवधी चाहते असणाऱ्या आणि आपल्या आवाजाच्या जादून सर्वांना वेड लावणाऱ्या प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर अरिजीत सिंह याने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

अरिजीत सिंगने घेतलेल्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांनाच नव्हे तर सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने आता पार्श्वगायक म्हणून  न गाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विशेष म्हणजे त्याने आपल्या या मोठ्या निर्णयाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांना दिली आहे.

अरिजीत सिंह याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलय की, 'सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. तुम्ही इतके वर्ष श्रोते म्हणून प्रेम केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मला घोषणा करताना आनंद होत आहे की, मी आतापासून कोणतंही नवीन गाणं गाणार नाहीये. कारण मी आता थांबतोय. आतापर्यंतचा हा प्रवास खूप चांगला होता'. 

अरिजीत सिंह याने आपल्या निर्णयाबद्दल कळवताना तो संगीत क्षेत्रापासून कायमचा दूर जात नसल्याचेही स्पष्ट केलं आहे. मात्र नव्या वर्षांत तो कोणत्याही सिनेमासाठी गाणे रेकॉर्ड करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

Mumbai News: वांद्र्यात वातावरण चिघळलं! पोलिसांकडून लाठीचार्ज, स्थानिकांकडून दगडफेक; व्हिडिओ व्हायरल

Record: वैभव सूर्यवंशी भारतीय फलंदाजांमध्ये ठरला टॉपर! इशान, तिलक, संजूवर पडला भारी; आणखी दोन धावा अन् वर्ल्ड रेकॉर्ड नावावर...

Maharashtra Political Devlopments : कार्यकर्त्यांना लाल दिव्याची वाहने मिळणार? महायुतीमध्ये महामंडळ वाटपाला वेग; पुढील महिन्यात अंतिम निर्णयाची शक्यता

SCROLL FOR NEXT