ashok saraf in navara maza navasacha 2 sakal
Premier

Navara Maza Navsacha 2: प्रेक्षकांचा लाडका एसटी कंडक्टर झाला टीसी; 'नवरा माझा नवसाचा २' मधील अशोक मामांचा लूक समोर

Ashok Saraf in Navara Maza Navasacha: 'नवरा माझा नवसाचा २'या चित्रोतातील अशोक सराफ यांचा लूक नुकताच समोर आला आहे. त्यांचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय

Payal Naik

Navara Maza Navsacha 2 Release Date: 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. या चित्रपटाची कथा, यातील कलाकार, संवाद आणि गाणी सगळंच अफलातून होतं. प्रत्येक कलाकाराने त्याची भूमिका अगदी चोख बजावली होती. तर एसटी मधल्या या प्रवासात आत येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडलं. या सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे होते ते म्हणजे प्रेक्षकांचे लाडके अशोक सराफ. सिनेसृष्टीचे मामा म्हणवले जाणारे अशोक सराफ आता 'नवरा माझा नवसाचा २' मध्येदेखील दिसणार आहेत. नुकताच त्यांचा या चित्रपटातील लूक समोर आला आहे.

अभिनेते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २'ची घोषणा केली आणि प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या चित्रपटाबद्दल सगळं जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासोबत हेमल इंगळे, स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत आहेत. जेव्हा चित्रपटाची घोषणा करण्यात आली तेव्हा या चित्रपटात अशोक सराफ नाहीत का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आता अखेर त्याचं उत्तर मिळालं आहे. अशोक सराफ यांचा लूक समोर आला आहे.

सचिन आणि अशोक मामा यांनी एक चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात मामा खेड रेल्वे स्टेशनवर दिसत आहेत. त्यांनी 'नवरा माझा नवसाचा' मधील कंडक्टरचा पोशाख घातला आहे. मात्र ते पुढे चालत येतात आणि त्यांचा पोशाख बदलतो. निळा कोट आकाशी शर्ट आणि गळ्यात आयकार्ड असा लूक समोर येतो. ते उभे आहेत ते मुख्य तिकीट निरीक्षक कार्यालय आहे. एकूणच या चित्रपटात अशोक मामा हे कंडक्टर नाही तर टीसीच्य भूमिकेत दिसणार आहेत.

हा चित्रपट रेल्वेतील प्रवासात शूट करण्यात आला आहे. या व्हिडिओसोबतच त्यांनी प्रेक्षकांना आणखी एक बातमी दिली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख उद्या म्हणजेच २० जुलै रोजी समोर येणार आहे. आता प्रेक्षक तारीख जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Temperature Drop: नागपुरात थंडीची लाट! तापमान १०.८ अंशांवर; नागरिकांना हुडहुडी

Sakal Suhana Swasthyam : अमृताकडे जाण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीतून प्रशस्त; आध्यात्मिक योगगुरू श्री एम यांचे प्रतिपादन

FIFA World Cup 2026 : मेस्सी विरुद्ध रोनाल्डो QF मध्ये भिडणार; वर्ल्ड कप २०२६ चे गट जाहीर, डोनाल्ड ट्रम्प यांना 'शांतता' पुरस्कार

MPSC Exams 2026: एमपीएससी 2026 वेळापत्रक जाहीर; राज्यसेवा, वनसेवा, गट-ब–क परीक्षांचे दिनांक स्पष्ट

Panchang 6 December 2025: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT