ashvini bhave  esakal
Premier

शूटिंगसाठी आडगावात राहायला तयार नव्हत्या अश्विनी; समोरून निळू फुले आले अन्... त्याच चित्रपटाने घडवला इतिहास

Ashvini Bhave On Nilu Phule: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांचा आणि निळू फुले यांचा किस्सा सांगितला आहे.

Payal Naik

Ashvini Bhave Unknown Facts: लोकप्रिय मराठी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी ९० च्या दशकात आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलं. त्यांच्या नावाची हिंदी सिनेसृष्टीतही प्रचंड चर्चा होती. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. त्यांनी अशाच एका हिट चित्रपटात दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्यासोबत काम केलं होतं. मात्र सुरुवातीला अश्विनी या चित्रपटात काम करायला नकार देत होत्या आणि त्याचं कारण होतं तिथे राहायची जागा. शुटिंगच्या ठिकाणी व्यवस्थित राहायला नसल्याने त्यांनी दिग्दर्शकाला नकार दिला होता. मात्र निळू फुले यांच्यामुळे सगळं चित्र बदललं.

या प्रसंगाबद्दल अश्विनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. अश्विनी सध्या 'घरत गणपती' चित्रपटात दिसत आहेत. या निमित्ताने त्यांनी आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्या म्हणाल्या, 'एका चित्रपटाच्या शूटिंगला गेले होते आणि खूप आडगावामध्ये टाकलं होतं आम्हाला. राहायची सोय नव्हती. अशी सोडून दिलेली बांधकामं असतात ना त्याच्यावर पत्रे टाकून रूम बनवलेले. ती रूम मला दिलेली. मला तिथे एक महिना काढायचा होता. माझी मुख्य भूमिका होती. मी इतक्या तावातावाने गेले आणि म्हणाले, मी नाही राहणार इथे. आणि समोरून निळू भाऊ आले.'

त्या पुढे म्हणाल्या, 'ते मला म्हणाले, जाऊदेना अश्विनी. चांगला माणूस आहे. चांगला पिक्चर करायचा प्रयत्न करतोय. करून टाकूया. म्हटलं, आईला निळू भाऊ असं म्हणतायत तर मी कोण आहे. आणि मी थांबले. तो चित्रपट होता 'हळद रुसली कुंकू हसलं'. ज्या चित्रपटासाठी मला अर्धा महाराष्ट्र ओळखतो. तो निळूभाऊंमुळे झाला.' अश्विनी यांनी याच मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं आहे. आपल्याला कधीच इंडस्ट्रीतील नवरा नको होता. हे आपलं आधीचं ठरलं होतं असं त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडील गेले, घरची जबाबदारी खांद्यावर आली; दिवसा बांधकामावर मजुरी अन् रात्री अभ्यास, अभिषेक बनला अधिकारी! पण यश बघायला बाप नसल्याने भावूक

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानात आत्मघाती हल्ला; १३ ठार, ३५ जखमी

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

SCROLL FOR NEXT