anant ambani wedding 
Premier

Anant Radhika Wedding: अनंत-राधिकाचं लग्न कर्मचाऱ्यांच्या पथ्यावर; बीकेसीतील कंपन्यांना १५ जुलैपर्यंत वर्क फ्रॉम होम, 'हे' आहे कारण

Anant Radhika Wedding Update: राधिका आणि अनंत यांच्या लग्नासाठी सॅमसंगचे सीईओदेखील मुंबईत हजर झाले आहेत. आज त्यांचा शाही विवाह पार पडणार आहे.

Payal Naik

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा आज १२ जुलै रोजी व्यावसायिक वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या लग्नासाठी परदेशातील पाहुणे हजर झाले आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड कलाकारांपासून ते मोठमोठ्या राजकारण्यांपर्यंत, प्रत्येक बड्या कंपनीच्या सीईओपासून ते प्रत्येक राज्यातील मुख्यपर्यंत प्रत्येकाला या लग्नाचं आमंत्रण आहे. त्यांच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र अशातच एक मोठी समोर येते आहे. १२ जुलै पासून बीकेसीमधील अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत. जाणून घ्या कारण.

राधिका आणि अनंत यांचा शाही विवाहसोहळा बीकेसी म्हणजेच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडणार आहे. हा सोहळा १४ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. १३ तारखेला शुभ आशीर्वाद हा कार्यक्रम पार पडणार आहे. मात्र बीकेसीमध्ये अनेक बड्या कंपन्या आहेत. लाखो कर्मचारी दररोज येथे कामासाठी येतात. त्यात या लग्नाचा सर्व लवाजमा एकाच ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. या लग्नामुळे बीकेसी येथे कामासाठी येणाऱ्या व्यक्तींची आणि मुंबईतील स्थानिक रहिवासी यांची गैरसोय होऊ नये, शिवाय पाहुणे आणि कर्मचारी दोघेही ट्रॅफिकमध्ये अडकू नयेत, लग्नात कोणतीही अडचण येऊ नये, यामुळे गर्दी टाळण्यासाठी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या लग्नाच्या स्थळाभोवती १२ ते १५ जुलैपर्यंत वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

पाहुण्यांसाठी खास हॉटेल्स

त्यामुळे अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भागात भारताचे प्रमुख स्टॉक एक्सचेंज, बाजार नियामक आणि अनेक आंतरराष्ट्रीय बँका आहेत. या भागातील अनेक सेव्हनस्टार हॉटेल्स पूर्ण बुक झाले आहेत. बॉलिवूड, हॉलिवूड सेलेब्रिटी आणि अंबानींच्या इतर पाहुण्यांसाठी खास या हॉटेल्समध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या हॉटेलच्या एका रूमची किंमत १ लाखांपर्यंत आहे. इतर दिवशी हीच किंमत १३ ते १५ हजार इतकी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT