Jahnavi Killedar  sakal
Premier

Jahnavi Killekar: 'भाग्य दिले तू मला' फेम अभिनेत्रीच्या घरी चोरी; अनेक वस्तू लंपास, धसक्याने आईला अर्धांगवायूचा झटका

Jahnavi Killekar's House Burglary: लोकप्रिय अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या घरी चोरी झाली आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Payal Naik

अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या घरी झालेल्या चोरीची घटना ताजी असताना आता आणखी एका अभिनेत्रीच्या घरी चोरांनी डल्ला मारला आहे. घरातील मौल्यवान वस्तू चोरटयांनी लंपास केल्या आहेत. अभिनेत्रीने या व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली. 'भाग्य दिले तू मला' मालिकेतील सानिया म्हणजेच अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिच्या घरी चोरी झाली आहे. तिने व्हिडिओ शेअर करत सगळ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं. या घटनेचा धसका घेतल्याने अभिनेत्रीच्या आईला अर्धांगवायूचा झटका झाला आहे.

जे शक्य झालं ते सगळं नेलं

जान्हवीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने म्हटलं, 'नमस्कार. माझं पेणमध्ये एक छोटंसं घर आहे. आम्ही विकेंडला तिकडे जातो. मी माझ्या मम्मी पपांसोबत शनिवार रविवार तिकडे जाते. त्या घरात नुकतीच चोरी झाली आहे. त्या घरातल्या बऱ्याच वस्तू चोरटयांनी नेल्या आहेत. जसं आमच्या घरातले स्पीकर्स, गिटार, महागड्या साड्या, महागड्या घड्याळांचं कलेक्शन अशा बऱ्याच गोष्टी चोरीला गेल्यात. त्यांना जे चोरणं शक्य झालं त्यांनी ते सगळं नेलंय. त्यांनी तर एसी काढण्याचा पण प्रयत्न केलाय पण कदाचित त्यांना ते जमलं नसेल. फ्रिज हलवण्यात आला आहे. पण काही गोष्टी न्यायला शक्य नसल्याने राहू दिल्यात.'

पुढे ती म्हणते, 'व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण हेच आहे की तुमचंही एखादं बंद घर असेल, वीकेंड होम असेल तर काळजी घ्या. चोरांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. ते नजर ठेवून असतात की या घरात कोण किती वाजता येतं, कधी असतात, मग वेळ साधून ते चोरी करतात. आपण खूप मेहनत करून, आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात त्या गेल्या की वाईट वाटतं. पेण पोलीस याचा तपास करतायत पण चोर हाती लागतील असं वाटत नाही. पण या घटनेमुळे एक वाईट गोष्ट अशी घडली की माझ्या आईने या गोष्टीचा धसका घेतला आणि तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. आताही ती हॉस्पिटलमध्ये आहे. आता तिची तब्येत ठीक आहे.' असं म्हणत तिने आपल्या घराची काळजी घेण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Political: सत्तेचा नवा अध्याय, की महायुती?; सातारा जिल्हा परिषदेवर भाजपने दावा केल्याने वाढली रंगत; कोण कोणासोबत, याची उत्सुकता!

Latest Marathi News Update : टिपू सुलतानाचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील - सपकाळ

Brain Activity After Death : मृत्यूनंतर ऐकू येतात 'हे' भयानक शब्द, डॉक्टरांच्या संशोधनात थक्क करणारी माहिती समोर

नव्या मालिकेची नवी सुरुवात! 'लक्ष्मीनिवास' फेम अभिनेत्री साकारतेय मुख्य भूमिका; सोबतीला आहेत हे कलाकार; प्रोमो व्हायरल

तुमचे आई-वडील कोण हे आम्हीच ठरवायचं का? SIR प्रकरणी याचिकेवर CJI सूर्यकांत यांची नाराजी

SCROLL FOR NEXT