New character entry in Paru serial 
Premier

Paru : सूर्यकांत कदम परत आलाय ! पारू मालिकेत 'या' अभिनेत्याच्या एन्ट्रीने सगळ्यांना बसला धक्का !

New character entry in Paru serial : झी मराठीवरील पारू मालिकेत नवीन कलाकाराची एंट्री होतेय. कोण आहे 'हा' कलाकार जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Serial Update : मराठी टेलिव्हिजनविश्वातील अनेक मालिका सध्या त्यातील ट्विस्ट अँड टर्न्समुळे चर्चेत असतात. सध्या इंटरेस्टिंग कथानकामुळे चर्चेत असलेली एक मालिका म्हणजे झी मराठीवरील 'पारू'. पारू नावाच्या साध्या सरळ मुलीची गोष्ट असणारी ही मालिका सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय. साधी सरळ पारू आणि खंबीर, शिस्तप्रिय अहिल्यादेवी यांची गोष्ट असणारी ही मालिका सध्या गाजत असून आता या मालिकेत नवीन कलाकाराची एंट्री होणार आहे.

नुकतंच झी मराठीच्या सोशल मीडिया हँडलवर पारू मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला. प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलंय कि, अहिल्यादेवींना त्यांच्या बेडरूममध्ये एक बुके ठेवलेला दिसतो आणि त्यांना एक फोन येतो. फोनवर त्यांना एक व्यक्ती धमकी देतो आणि तो स्वतःची ओळख सूर्यकांत कदम अशी ओळख करून देतो. हे नाव ऐकताच अहिल्यादेवी संतापतात असं दाखवण्यात आलंय. अहिल्यादेवींचा शत्रू असलेल्या सूर्यकांत कदमची व्यक्तिरेखा साकारणार आहेत मराठी इंडस्ट्रीतील सुपरस्टार भरत जाधव. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर गाजतोय.

पहा प्रोमो:

भरत हे या मालिकेत माजी मंत्र्याच्या भूमिकेत दिसणार असून अहिल्यादेवींना धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सूर्यकांत कदमची व्यक्तिरेखा ते या मालिकेत साकारणार आहेत. बऱ्याच काळाने निगेटिव्ह भूमिकेतून भरत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मालिकेचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असून अनेकांनी कमेंट करत भरत यांना या मालिकेत पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत असं म्हंटलं.

आता हा सूर्यकांत कदम अहिल्यादेवींच्या आयुष्यात आणि साम्राज्यात काय उलथापालथ करणार? याचे काय परिणाम पारूच्या आयुष्यावर होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तेव्हा पहायला विसरू नका 'पारू' दररोज रात्री ७:३० वाजता फक्त झी मराठीवर आणि झी5 अॅपवर .

बऱ्याच काळाने भरत मालिकेत दिसणार असून या आधी त्यांनी कलर्स मराठीवरील 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेत काम केलं होतं. सीट कॉम प्रकारातील त्यांची ही मालिका अनेकांना आवडली होती. तर झी मराठीवरील 'प्रपंच' ही भरत जाधव यांची मालिका खूप गाजली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SEBI Report: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनो सावधान! 91% लोकांना होतोय तोटा; सेबीच्या अहवालात काय आहे?

Tiger Crisis: धक्कादायक... राज्यात सरासरी पाच दिवसांत एका वाघाचा मृत्यू; विदर्भात सहा महिन्यांत तीस वाघ गमावले, महाराष्ट्र आघाडीवर

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल मिळाला पाहिजे; पाकिस्ताननंतर आता इस्त्रायलकडून शिफारस

Shravan Month 2025 Fasting Benefits: श्रावणातील उपवासामुळे मिळते शरीराला नैसर्गिक डिटॉक्स, जाणून घ्या फायदे

Bharat Bandh: 'या' दिवशी भारत बंदची घोषणा, 25 कोटींहून अधिक कर्मचारी जाणार देशव्यापी संपावर, अत्यावश्यक सेवा देखील होणार ठप्प

SCROLL FOR NEXT