Bharti Singh esakal
Premier

Bharti Singh: भारती सिंहची अचानक तब्येत बिघडली; असह्य वेदना झाल्यानं हॉस्पिटलमध्ये झाली दाखल, म्हणाली...

Bharti Singh: भारतीची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

priyanka kulkarni

Bharti Singh: कॉमेडी क्विन भारती सिंह (Bharti Singh) ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. भारती ही युट्यूबवर तिचे व्लॉग शेअर करत असते. या व्लॉगच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करते. नुकताच भारतीनं एक व्लॉग युट्यूबवर शेअर केला आहे. या व्लॉगच्या माध्यमातून भारतीनं तिच्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली आहे. भारतीची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

भारतीची तब्येत बिघडली

भारतीने तिच्या व्लॉगमध्ये सांगितलं की, गेल्या तीन दिवसांपासून तिचं पोटात दुखत होते. तिला असह्य वेदना झाल्या. त्यानंतर तिची टेस्ट करण्यात आली. पित्ताशयात खडा झाल्याचं या टेस्टच्या रिपोर्टमधून तिला कळालं.

भारतीवर होणार सर्जरी

भारतीनं व्लॉगमध्ये सांगितलं आहे की, शस्त्रक्रिया हा एकमेव उपाय आहे . माझ्याकडे शस्त्रक्रिया करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. भारतीनं व्लॉगद्वारे चाहत्यांना सांगितलं की, जर तुम्हाला कधीही असह्य पोटदुखी होत असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.

भारती झाली भावूक

व्लॉगमध्ये तब्येतीचे अपडेट देताना भारती भावूक झाली होती. गेल्या तीन दिवसांपासून माझी तब्येत बिघडल्यानं मी कोणालाही झोपू दिले नाही, असंही भारतीनं व्लॉगमध्ये सांगितलं.

व्लॉगमध्ये मुलाबद्दल बोलताना भारती म्हणाली, "मी रात्री उशिरा 10-11 च्या सुमारास रुग्णालयात गेले आणि त्यावेळी माझा मुलगा गोला गाढ झोपला होता. गोला मला घरी शोधत आहे."

भारतीनं 'या' शोमध्ये घेतला सहभाग

भारती सिंहने द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमधून स्टँड-अप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरुवात केली. कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स बचाओ, द कपिल शर्मा शो आणि झलक दिखला जा 5 यांसारख्या शोमध्ये भारतीनं सहभाग घेतला.

2017 मध्ये भारतीनं हर्ष लिंबाचियाशी लग्न केले. 2022 मध्ये भारतीनं मुलाला जन्म दिला, त्याचे नाव लक्ष लिंबाचिया असं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT