Suraj Chavan: बिग बॉस मराठी फेम 'गुलीगत' सूरज चव्हाणची मोठ्या पडद्यावर होणार दमदार एन्ट्री sakal
Premier

Suraj Chavan: बिग बॉस मराठी फेम 'गुलीगत' सूरज चव्हाणची मोठ्या पडद्यावर होणार दमदार एन्ट्री

Latest Bigboss Marathi News : यंदाच्या सीझनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. यातच काही स्पर्धक हे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Latest Marathi Entertainment News: बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या सीझनमधील हटके स्पर्धक आणि नवा होस्ट या सगळ्याच गोष्टी उत्तम जुळून आल्याचं पाहायला मिळतय. त्यामुळे यंदाच्या सीझनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. यातच काही स्पर्धक हे सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. यापैकी एक स्पर्धक म्हणजे सूरज चव्हाण.

सूरज चव्हाणचा स्वभाव आणि माणूसकी जपण्याचा गुण प्रेक्षकांना आवडतोय. शिवाय 'गुलीगत', 'बुक्कीत टेंगुळ' असे त्याचे डायलॉगही सोशल मिडीयावर चर्चेत आले आहेत. सध्या बिग बॉस मराठी गाजवणारा सूरज चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झालाय.

एका छोट्याश्या खेडेगावातून आलेल्या सूरजने सोशल मिडीयावर रील्स बनवून प्रसिद्धी मिळवली. याच प्रसिद्धीच्या जोरावर त्याला बिग बॉस मराठीची संधी मिळाली. आता मोठ्या पडद्यावरही सूरजची हवा पाहायला मिळणार आहे. लवकरच सूरज हा 'राजाराणी'या चित्रपटातून मोठा पडदा गाजवणार आहे.

नुकताच या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झालाय. या पोस्टरमध्ये देखील सूरजचा हटके अंदाज आणि लूक पाहायला मिळतोय. सत्य घटनेवर आधारित प्रेम कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार असून सूरजची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. सूरज या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या मित्राच्या भूमिकेत पाहायला मिळेल. सूरजला अशा हटके भूमिकेत पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बिग बॉस मराठीच्या घरात सूरजने सर्व स्पर्धकांसोबत चांगली मैत्री आणि नातं जपलय. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणार्‍या सूरजने बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांचीही मनं जिंकलेली दिसत आहेत.

नुकत्याच झालेल्या कॅप्टन्सी टास्कमध्ये तर सूरजने त्याची वेगळी बाजू प्रेक्षकांना दाखवत स्पर्धक अरबाजला देखील टक्कर दिली होती. यासाठी या कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुखनेही त्याचं कौतुक केलं होतं.

सूरज झळकणार असलेल्या राजाराणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे.

संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा 'राजाराणी' हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harbhajan Singh : भारतात ऑफस्पिनरचा दुष्काळ; अष्टपैलूंपेक्षा निष्णांतांची गरज

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : पुण्यात पहिल्या दोन तासांत ५.५० टक्के मतदान

BCCL IPO Updates : IPO गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! BCCL ची लिस्टिंग पुढे ढकलली; नवी तारीख काय? GMP मध्ये धुमाकूळ!

Ichalkaranji Clash : इचलकरंजीत पैसे वाटपावरून राडा, भाजपमधील अंतर्गत वाद उफाळला; माजी उपनगराध्यक्षांसह १५ जणांवर गुन्हा, पोलिसांसमोरच दिली धमकी

'गळा दाबला आणि...' ओमकार-विशालमध्ये तुफान हाणामारी, बिग बॉसच्या घरात नुसता राडा, नेटकरी म्हणाले...'डोकं फोडा आणि कॅप्टन व्हा'

SCROLL FOR NEXT