nikki tamboli  esakal
Premier

बिग बॉस मराठीच्या घरात वाहणार प्रेमाचे वारे! एंट्री करताच त्याच्यावर भाळली निकी तांबोळी, म्हणते- त्याला पाहून...

Nikki Tamboli In Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा ग्रँड प्रीमियर सध्या उत्साहात सुरू आहे. त्यात निकी तांबोळी देखील या घरात दिसणार आहे.

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' च्या ग्रँड प्रीमिअरसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे. या सीझनमध्ये घरात कोण कोण जाणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यातील अनेक स्पर्धकांची एंट्री बिग बॉसच्या घरात झाली आहे. यावेळेस घरात वैविध्य पाहायला मिळत आहे. मराठी कलाकार ते गायकांपासून अन नेते ते हिंदी कलाकारांपर्यत सगळेच घरात कल्ला करायला तयार आहेत. अशातच लोकप्रिय हिंदी अभिनेत्री निकी तांबोळीची देखील 'बिग बॉस मराठी ५'च्या घरात एंट्री झाली आहे. निकी नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली. आता तिच्या येण्याने घरात प्रेमाचे वारे वाहणार असं दिसतंय. कारण घरात आल्या आल्या एका सदस्यावर ती फिदा झाली आहे.

निकीने यापूर्वी 'बिग बॉस १४' मधून सगळ्यांची मनं जिंकली होती. आता ती मराठी बिग बॉसच्या घरात आली. तिने येताच बिग बॉसकडे काही होत सदस्यांची अट ठेवली होती. तिची ही अटदेखील पूर्ण झाली. घरात 'मन झालं बाजिंद' फेम वैभव चव्हाण आणि स्प्लिट्स व्हिला फेम अरबाज पटेल याची एंट्री झाली. त्यात त्या दोघांनीही पाहून निकी इम्प्रेस झाली होती. मात्र त्यातही अरबाजच्या शरीरयष्टीकडे पाहून ती लाजताना दिसली. तर त्याला पाहून मी सगळंच विसरलीये असं ती म्हणाली. त्यात रितेशने त्याच्याबद्दल विचारताच आता थोडं थोडं काहीतरी होऊ शकतं असं ती म्हणाली. तर अरबाजही तिला आता सगळीकडे मीच दिसेन, माझ्याशिवाय तिला काही सुचणार नाही असं म्हणाला.

एकूणच दोघेही एकमेकांना आवडू लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात घरात प्रेमाचे वारे वाहू लागले तर नवल वाटायला नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय नागरिकत्वाशिवाय मतदार यादीत नाव, सोनिया गांधींसह दिल्ली पोलिसांना कोर्टाची नोटीस

प्रथमेश परबचा 'डिलिव्हरी बॉय' घराघरात पोहोचणार; वर्षअखेरीस अल्ट्रा झकासवर मराठी चित्रपटांची 'डबल धमाल'!

Latest Marathi News Live Update : बीडमधील केजमध्ये गावगुंडांची दहशत

Nagpur Accident: नागपूर अमरावती महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Pune Municipal Election : इच्छुकांनी घेतले तीन हजार उमेदवारी अर्ज; १६५ जागांसाठी राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT