janhavi killekar  esakal
Premier

मी लूक्स पाहून त्याला... नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना जान्हवी किल्लेकरने सुनावलं, म्हणाली- हो आहे तो काळा पण

Jahnavi Killekar Angry On Trollers: लोकप्रिय मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने 'बिग बॉसच्या घराबाहेर येताच आपल्या नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे.

Payal Naik

'बिग बॉस मराठी ५' मधील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सुरुवातीला आपल्या वागण्यामुळे प्रेक्षकांची नाराजी ओढवून घेतली. मात्र जशी तिला तिची चूक कळाली तेव्हा तिने ती सुधारली देखील. मात्र त्या काळात तिच्या वागण्यामुळे तिच्या घरातल्यांना त्रास सहन करावा लागला होता. तिच्या पती आणि मुलाला सोबतच तिच्या सासरच्या लोकांना देखील प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. आता घराबाहेर आल्यावर जान्हवीने आपल्या नवऱ्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. आपण त्याच्या लूक वर प्रेम नाही केलं तर तो माणूस म्हणून कसा आहे हे पाहिलं असं जान्हवी म्हणाली.

घराबाहेर आल्यावर जान्हवीने मीडिया टॉल्क मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत जान्हवी म्हणाली, 'मला सगळ्यात आधी बाहेर आल्यावर खूप दुःख झालं. माझा नवरा, माझा मुलगा, माझे सासूसासरे, जाऊबाई, मम्मी पप्पा अशा पद्धतीने ट्रोल झाले. मला काय म्हणायचंय माझी चूक आहे ना तुम्ही मला बोला. त्यांना नका बोलू. त्यांची काहीच चूक नाहीये. अजून बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या. इडलीवाला वगरे, काही मीम बनवले. का ना एखाद्याच्या लूकवर जावं. माझा स्वभाव नाहीये. मी माणसाच्या लुकवरून प्रेम नाही करत. तो माणूस किती टॅलेंटेड आहे किंवा तो माणूस काय करू शकतो यावरून जान्हवी जज करते लोकांना. हा माणूस खूप सुंदर दिसायला आहे, खूप हँडसम आहे अशा व्यक्तीकडे बघून जान्हवीला कधी प्रेम नाही वाटलं.'

ती पुढे म्हणाली, 'तो व्यक्ती माणूस म्हणून कसा आहे, तो माझ्यासाठी काय करू शकतो हे बघून मला प्रेम झालंय त्याच्यावर. ही माझी चॉईस आहे. मला माहितीये माझा निर्णय नाही चुकलाय. तुम्ही सगळे का जज करताय. मला माहितीये माझा नवरा कसा आहे. तो काळा आहे, सावळा आहे, माझा आहे. माझ्यासाठी तो परफेक्ट आहे. मला झेलणं साधं नाहीये. तो घरात मला आणि माझ्या मुलाला दोघांनाही सांभाळतो. काल रात्रीपासून मी त्याला जो त्रास दिलाय. तो पण म्हणाला, तू नव्हतीस ती बरी होतीस. मी ईशानला सांभाळत होतो. हे सगळं माझा नवराच माझ्यासाठी करतो त्यामुळे तो माझ्यासाठी बेस्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

Gorakhpur Mumbai Train Bomb Threat : गोरखपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची धमकी; प्रवशांमध्ये खळबळ अन् शोधमोहीम सुरू

Latest Marathi Breaking News: कामातील निष्काळजीपणा भोवला, दोन अभियंते निलंबित

SCROLL FOR NEXT