Bigg Boss Marathi New Promo Esakal
Premier

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉसने पळवलं घरच्यांच्या तोंडचं पाणी; पहिल्याच दिवशी सदस्य झाले हैराण

Bigg Boss Marathi Latest Update : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी शो दणक्यात सुरू झालाय. पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या कारवाईमुळे सदस्य हैराण झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठीचं नवीन पर्व सुरू झालंय. नुकताच कलर्स मराठीचा ग्रँड प्रीमियर दणक्यात पार पडला आणि बिग बॉसच्या घरात 18 सदस्यांची एन्ट्री झाली चंदा बिग बॉस मराठीचा होस्टिंग रितेश देशमुख करतोय आणि त्यामुळे या नव्या सीजन विषयी प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता आहे बिग बॉस मराठीचा नवा सीजन तरी दणक्यात सुरू झाला असला तरी पहिल्याच दिवशी बिग बॉसनी मात्र सदस्यांना हैराण केलं

कलर्स मराठी वर नुकताच बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला या प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की घरातील सदस्य दुसऱ्या दिवशी उठतात तेव्हा बिग बॉसच्या घरातील सगळं पाणी संपलेलय बाथरूम आणि किचनमध्ये अगदी प्यायला सुद्धा पाण्याची व्यवस्था नाहीये त्यामुळे घरातील सदस्य त्यांचे दैनंदिन तास करण्यात यशस्वी ठरतात आणि ते ह्याची तक्रार बिग बॉस जवळ करतात तेव्हा बिग बॉस आता फक्त घरातील पाणीच बंद झाले पण पुढे बिग बॉस तुमच्या तोंडच पाणी पळवणार आहेत असं म्हणतात हे ऐकल्यावर सगळे सदस्य हैराण होतात सोशल मीडियावर बिग बॉसचा हा प्रोमो चांगला चर्चेत आहे

सोशल मीडियावर हा प्रोमोशन होताच अनेक आणि कमेंट करत पहिला स्टार कदाचित पाणी जमवण्याचा असावा असा अंदाज व्यक्त केलाय तर काहींनी हा बिग बॉसचा पाचवा सिझन असल्यामुळे नवीन एखादा टास्क मिळेल असा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे पण नेमकं बिग बॉस मराठीच्या या घरात काय घडणार आहे हे पाहण्यासाठी थोडा धीर प्रेक्षकांना धरावा लागणार आहे

बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीझनमध्ये घरात 18 सदस्यांची एन्ट्री झाली आहे. वर्षा उसगावकर, पंढरीनाथ कांबळी, योगिता चव्हाण,जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, घनश्याम दरवडे, इरीना दुरोकावा, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, पुरुषोत्तम दादापाटील, सुरज चव्हाण, निकि तांबोळी आणि आर्या जाधव ही विविध क्षेत्रातील मंडळी आता बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून वावरताना दिसतील

बिग बॉस मराठीच्या या पाचव्या पर्वत घरातील स्पर्धक आता घरात काय राडा घालणार ? कोणाची मैत्री होणार तर कोणाची दुश्मनी होणार ? हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीजन 5 दररोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठी वर आणि जिओ सिनेमा वर कधीही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रक्ताचा सडा! खोपोली बोगद्याजवळ 5 गाड्यांचा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; 3 जण जागीच ठार

LPG E-KYC Mandatory : सिलिंडर हवाय? मग आधी 'हे' काम करा; गॅस केवायसीसाठी सरकारने दिली नवीन सोय

Gudi Padwa 2026 Recipes: साखरेच्या गाठी बाजारातून विकत घेण्याऐवजी घरीच तयार करा; इतकी सोपी रेसिपी तुम्हाला कुठेच नाही मिळणार

Kagal MIDC Accident : दुबईहून सुट्टीला आलेल्या १३ वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Pune ZP President Election : पुणे जिल्हा परिषदेसाठी अखेर अध्यक्ष-उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठरले; दोन्ही पदे राष्ट्रवादीकडेच राहणार

SCROLL FOR NEXT