Nikki Tamboli wins a spot in the Bigg Boss Marathi Season 5 finale, leaving fans divided over her victory. esakal
Premier

Bigg Boss Marathi: "अरबाजच्या भिकेमुळे..."; निक्कीचं कौतुक अन् टीकाही, दुसरा फायलनलीस्ट कोण ठरणार... सर्वाधिक मतं कुणाला?

Nikki Tamboli Enters the Finale, Audience Split Between Praise and Criticism : ‘तिकीट टू फिनाले’ टास्कमध्ये सदस्यांना झेंडे आणण्याचे आव्हान देण्यात आले होते, ज्यात सुरुज विजयी ठरला. मात्र, अरबाजने दिलेल्या म्युच्युअल फंड्समधील कॉइन्समुळे निक्की आधीच ‘तिकीट टू फिनाले’ उमेदवार ठरली होती.

Sandip Kapde

निक्की तांबोळी ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सिझनमध्ये फायनलमध्ये पोहोचणारी पहिली स्पर्धक ठरली आहे. काल सुरुज आणि निक्कीमध्ये जोरदार टक्कर झाली, ज्यामध्ये निक्की जिंकून फायनलमध्ये पोहोचली. इतर सदस्य आता नॉमिनेशनवर अवलंबून आहेत.

‘तिकीट टू फिनाले’ टास्कमध्ये सदस्यांना झेंडे आणण्याचे आव्हान देण्यात आले होते, ज्यात सुरुज विजयी ठरला. मात्र, अरबाजने दिलेल्या म्युच्युअल फंड्समधील कॉइन्समुळे निक्की आधीच ‘तिकीट टू फिनाले’ उमेदवार ठरली होती. यानंतर सुरुज आणि निक्कीमध्ये दुसरा टास्क झाला आणि यात निक्कीने बाजी मारली.

सध्या निक्की सोडून घरात सहा सदस्य उरले आहेत – अभिजित सावंत, अंकिता वालवलकर, धनंजय पोवार, जानव्ही किल्लेकर, सुरुज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर. आता फायनलमध्ये कोण जाणार याची उत्सुकता लागली आहे.

निक्कीबद्दल कौतुक आणि टीका

निक्की फायनलमध्ये गेल्यामुळे काही चाहते टीका करत आहेत की, "भीक मागून निक्की फायनलमध्ये पोहोचली." तरी काही चाहत्यांचे म्हणणे आहे की सुरुज किंवा अंकिताने फायनलमध्ये जावे. मात्र, काही चाहत्यांनी निक्कीमुळे शोला उंची मिळाली आहे असे म्हणत तिचे कौतुक केले आहे.

maharashtrajob024 या इंस्टाग्राम पेजने व्होटींगची टक्केवाकी दिली आहे.

सुरुज – 51.55% (40856 मते)
धनंजय – 17.73% (14054 मते)
अंकिता – 12.07% (9570 मते)
जानव्ही – 5.40% (4281 मते)
पंढरीनाथ – 4.49% (3563 मते)
अभिजीत – 4.44% (3521 मते)
निक्की – 3.72% (2949 मते)
वर्षा – 0.59% (469 मते)

शोच्या पारदर्शकतेवर प्रश्न?

काही चाहत्यांनी शोच्या पारदर्शकतेवर शंका उपस्थित केली आहे. शो मनोरंजन म्हणून बघावा आणि मतं देताना विवेकबुद्धी वापरावी, असे त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT