Bigg Boss Marathi Season 5 SAKAL
Premier

Bigg Boss Marathi: प्रतीक्षा संपली! मराठी बिग बॉसच्या नव्या सीझनची घोषणा, यंदा महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार सूत्रसंचालन

Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉस मराठी सीझन-5 या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो रिलीज करण्यात आला आहे.

priyanka kulkarni

Bigg Boss Marathi Announcement : छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या कार्यक्रमाचे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. आता लवकरच या कार्यक्रमाचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi Season 5) येणार आहे. बिग बॉस मराठी सीझन-5 या कार्यक्रमाचा नुकताच प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसत आहे. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा नवा सीझन महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) नाही तर रितेश देशमुख होस्ट करणार आहे.

प्रोमोनं वेधलं लक्ष

कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये रितेश देशमुख हा स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे. या प्रोमोला कॅप्शन देण्यात आलं, मराठी मनोरंजनाचा“ BIGG BOSS”सर्वांना ”वेड” लावायला येतोय... "लयभारी”होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख !!फक्त कलर्स मराठीवर आणि जिओ सिनेमावर." बिग बॉस मराठीच्या या प्रोमोनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

यंदा महेश मांजरेकर नाही तर रितेश करणार सूत्रसंचालन

बिग बॉस हा शो विविध भाषांमध्ये प्रसारित केला जातो. यापैकी हिंदी बिग बॉसचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान करतो तर मराठी बिग बॉसच्या गेल्या चार सीझन्सचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर हे करत होते. आता बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनचे सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार आहे, त्यामुळे प्रेक्षक या सीझनची उत्सुकतेने वाट बघत आहेत.

आता बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या पाचव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमाच्या गेल्या चार सीझन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अक्षय केळकरने बिग बॉस मराठी या कार्यक्रमाच्या गेल्या सीझनचं विजेते पद पटकावले. तसेच मेघा धाडे,शिव ठाकरे,विशाल निकम या कलाकारांनी देखील बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

बिग बॅासचे घर ही नेहमीच रसिकांच्या औत्सुक्याची, कुतूहलाची बाब असते. या सिझनमध्ये बिग बॅासच्या या घरात आणखी काय काय नाविन्य असेल? काय एक्स्ट्रा गॅासिप अर्थात एक्स्ट्रा मनोरंजन पहायला मिळणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT