Brad Pitt sakal
Premier

Brad Pitt: वयाच्या 60 व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्न करणार 'हा' अभिनेता? सहा मुलं झाल्यानंतर घेतला होता अभिनेत्रीसोबत घटस्फोट

Entertainment News: ब्रॅड हा गर्लफ्रेंड इनेस डी रेमनसोबत (Ines De Ramon) लग्न करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

priyanka kulkarni

Brad Pitt: हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता ब्रॅड पिट (Brad Pitt) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सध्या चर्चेत आहे. ब्रॅड हा लवकरच तिसऱ्यांदा लग्न करणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ब्रॅड हा गर्लफ्रेंड इनेस डी रेमनसोबत (Ines De Ramon) लग्न करणार आहे, असं म्हटलं जात आहे.

ब्रॅड 60 व्या वर्षी करणार लग्न?

60 वर्षाच्या ब्रॅड हा लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. सूत्राने सांगितलं की, 'लाइफ अँड स्टाईल'ला सांगितले की, "ब्रॅड पिट हा त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज करणार आहे, असं म्हटलं जात आहे. हे कधीही घडू शकते. ब्रॅड हा इनेससोबत खूप आनंदी आहे."

कोण आहे ब्रॅड पिटची पहिली पत्नी?

ब्रॅड पिटने 2000 मध्ये अभिनेत्री जेनिफर ॲनिस्टनशी लग्न केले.जेनिफरला 'फ्रेंड्स' या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. 'मिस्टर अँड मिसेस स्मिथ'च्या शूटिंगदरम्यान ब्रॅड अँजेलिना जोलीच्या प्रेमात पडला. त्यानंतर तो 2005 मध्ये जेनिफरसोबत विभक्त झाला.

अँजेलिना जोली आणि ब्रॅडला आहेत सहा मुलं

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अँजेलिना जोली आणि ब्रॅडनं 2014 मध्ये लग्न केले. ब्रॅड आणि अँजेलिना जोली यांना मॅडॉक्स, झाहारा, पॅक्स, शिलोह, आणि जुळी मुले नॉक्स आणि व्हिव्हियन अशी एकूण सहा मुलं आहेत.

brad pitt

अँजेलिना जोलीनं ब्रॅडवर केले गंभीर आरोप

लग्नाच्या काही वर्षानंतर अँजलिना आणि ब्रॅडच्या नात्यात दुरावा आला. अँजेलिनाने ब्रॅडवर मुलांसमोर शारीरिक हल्ला केल्याचा आरोप केला होता. 2019 मध्ये अँजलिना आणि ब्रॅड हे विभक्त झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT