Priyanka Chopra sakal
Premier

Priyanka Chopra: टीव्ही होस्ट प्रियांकाला हे काय बोलून गेला, व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले...

Bollywood News: एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक टीव्ही होस्ट प्रियांकाचं नाव चुकीचं उच्चारताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Priyanka Chopra: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रियांकानं फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकानं काही दिवसांपूर्वी बल्गरी फॅशन इव्हेंटमध्ये हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील लूकमुळे प्रियांका चर्चेत होती. पण प्रियांका सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक टीव्ही होस्ट प्रियांकाचं नाव चुकीचं उच्चारताना दिसत आहे.

टीव्ही होस्ट हे काय बोलून गेला?

मार्चमध्ये, ब्रिटिश टीव्ही होस्ट अँडी पीटर्स हा मार्चमध्ये त्यांच्या 'गुड मॉर्निंग ब्रिटन' कार्यक्रमासाठी लंडनच्या मादाम तुसाद संग्रहालयात गेला होता. अँडी त्याच्या कार्यक्रमात या संग्रहालयात असणाऱ्या सेलिब्रिटींच्या मेणाच्या पुतळ्यांबद्दल बोलत होता. जेव्हा अँडी त्याच्या शोदरम्यान प्रियांकाच्या मेणाच्या पुतळ्याजवळ पोहोचला तेव्हा तो प्रियांकाचे नाव घेण्यात अडकला. तो प्रियंकाच्या पुतळ्याला "चियांका चॉप फ्री" असं म्हणतो. अँडीच्या कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झालेल्यानंतर प्रियांकाच्या चाहत्यांनी अँडीला ट्रोल केलं आहे.

पाहा व्हिडीओ:

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

अँडीच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "हे अस्वीकार्य आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "हा अनादर आहे."

प्रियांका ही लवकरच 'हेड ऑफ स्टेट' या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत इद्रिस एल्बा, जॉन सीना आणि जॅक क्विड सारखे मोठे हॉलिवूड स्टार काम करत आहेत. प्रियांकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : पीडीपी नेत्या इल्तिजा मुफ्ती यांनी बिजबेहरा येथील जाबलीपुरा फळ बाजारात फळ उत्पादकांच्या आंदोलनात सहभाग घेतला

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT