Vicky Kaushal & Katrina Kaif Esakal
Premier

Vicky Kaushal & Katrina Kaif : विकी-कतरिना लंडनमध्ये काय करत आहेत? व्हायरल व्हिडीओनंतर प्रेग्नेंट असल्याच्या अफवा...

अभिनेत्री कतरीना कैफ आणि तिचा नवरा विकीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडमधील एक पॉवर कपल म्हणजे विकी कौशल आणि कतरीना कैफ. दोन वर्षांपूर्वी लग्नबंधनात असलेली ही जोडी खूप लोकप्रिय आहे. या जोडीचे फोटोज, त्यांनी एकमेकांबद्दल दिलेल्या मुलाखती चर्चेत असतात.

स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं भाष्य न करणारी ही जोडी सध्या लंडनमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. सध्या कतरीना प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चांनी जोर धरलाय. त्यातच विकी आणि कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. झूम टीव्हीने इंस्टाग्राम चॅनेलवर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

लंडनमध्ये हातात हात घेऊन फिरतानाचा त्यांचा व्हिडीओ चर्चेत आहे आणि त्यातील कतरीनाचा लूक बघून अनेकांनी ती प्रेग्नेंट असल्याचा कयास बांधलाय आणि सोशल मीडियावर ही गोष्ट खूप चर्चेत आहे.

झूम टीव्हीच्या हवाल्याने सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार,"कतरीना आणि विकी त्यांच्या पहिल्या बाळाला लंडनमध्ये जन्म देणार आहेत. त्यांनी ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केला पण अखेर ही गोष्ट उघड झालीये. विकी कतरीनासाठी लंडनला गेलाय आणि ती तिथेच बाळाला जन्म देणार आहे."

सूत्रांनी जरी ही गोष्ट सांगितली असली तरीही या जोडीने याबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलं नाहीये. त्यामुळे ही बातमी खरी आहे कि नाही याबाबतही चाहते साशंक आहेत.

2021 मध्ये विकी आणि कतरिनाने राजस्थानमध्ये लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अतिशय मोजकी मित्रमंडळी आणि कुटूंबीय होते. बॉलिवूडमधील फार कमी कलाकरांना या लग्नाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यांच्या लग्नाबद्दल बरीच गुप्तता सुरुवातीच्या काळात राखण्यात आली होती. सोशल मीडियावर या जोडीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले होते.

विकीचा लवकरच 'छावा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT