Chandu Champion sakal
Premier

Chandu Champion: कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात; ओपनिंग-डेला केली 'इतकी' कमाई

Chandu Champion Box Office Collection Day 1: 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या ओपनिंग-डेच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत.

priyanka kulkarni

Chandu Champion Box Office Collection Day 1: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. सध्या कार्तिक हा त्याच्या 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काल (14 जून) कार्तिकचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. काल अनेकांनी या चित्रपटाचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला. "हा कार्तिकच्या करिअरमधील सर्वात बेस्ट परफॉर्मन्स आहे.", असं नेटकऱ्यांनी त्यांच्या रिव्ह्यूमध्ये लिहिलं. अशातच आता 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाच्या ओपनिंग-डेच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत....

'चंदू चॅम्पियन' चं बॉक्स ऑफिस कलेक्शन

sacnilk च्या रिपोर्टनुसार, कार्तिकच्या 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटानं ओपनिंग-डेला बॉक्स ऑफिसवर 4.75 कोटींची कमाई केली आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले आहे. राजपाल यादव आणि विजय राज यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.

'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचं दिग्दर्शन कबीर खान यांनी केलं आहे. कबीर खान यांच्या 83,बजरंगी भाईजान, एक था टाइगर आणि ट्यूबलाइट हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. आता त्यांचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट देखील सुपरहिट ठरणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT