Chhava esakal
Premier

Chhava: विकी कौशलच्या 'छावा'चित्रपटात मराठमोळ्या कलाकारांची वर्णी; सेटवरील फोटो व्हायरल

Chhava: 'छावा' या सिनेमाचं शूट सध्या सुरू असून या सिनेमात तीन मराठी कलाकारांची वर्णी लागलीये.

priyanka kulkarni

Chhava: अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) आगामी सिनेमा 'छावा' (Chhava) ची चर्चा सध्या सगळीकडे आहे. या सिनेमाचं शूट सध्या सुरू असून या सिनेमात तीन मराठी कलाकारांची वर्णी लागलीये. शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote), संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आणि आशिष पाथोडे (Ashish Pathode) हे कलाकार या सिनेमात दिसणार आहेत.

नुकतीच सोशल मीडियावर शुभंकरने एक स्टोरी रिपोस्ट केली. छावाच्या सेटवरील हा फोटो असून कोणत्यातरी सीनचं शूटिंग रात्रीच्या वेळी सुरू असल्याचं दिसत आहे. आशिष पाथोडेची ही स्टोरी शुभंकरने रिपोस्ट केली असून विकीला सुद्धा या स्टोरीमध्ये टॅग करण्यात आलं आहे. या फोटोमध्ये दोन मशाली जळत असून बाजूला भगवे ध्वज लावलेले दिसत आहेत. या दृश्यावरून मराठ्यांच्या छावणीचं हे दृश्य असावं असं वाटतंय.

शुभंकर, आशिष आणि संतोष कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. याशिवाय आणखी बरेच मराठी कलाकार या सिनेमात असतील असा अंदाज आहे.

विकी या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून अभिनेत्री रश्मीका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार, सिनेमात इतर कोण कलाकार असणार हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

'मिमी' फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शुभंकर आणि संतोषला विकिसोबत स्क्रीन शेअर करताना पाहायला त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Chhava

शुभंकरचं पुढच्या आठवड्यात लग्न असून अभिनेत्री अमृता बनेसोबत तो लग्नबंधनात अडकतोय. काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा पार पडला आणि त्यांच्या व्याहीभोजनाचे फोटोजही व्हायरल झाले. तर संतोषही बऱ्याच काळानंतर हिंदी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या आधी त्याचा 'रावरंभा' हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता तर 'पावनखिंड' सिनेमात त्याच्यावर चित्रित झालेलं 'राजं आलं' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. तर डार्लिंग्ज या सिनेमात त्याने साकारलेला सब इन्स्पेक्टरसुद्धा सगळ्यांना आवडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT