Chinmay Mandlekar esakal
Premier

Chinmay Mandlekar: "ट्रोलर्समुळे तुझ्या करिअरचे निर्णय बदलू नकोस"; चिन्मयच्या निर्णयावर अवधूत गुप्तेनी दिला सल्ला

Chinmay Mandlekar: दिग्दर्शक, गायक अवधूत गुप्तेनं (Avadhoot Gupte) चिन्मयसाठी एक खास पत्र लिहिलं आहे.

priyanka kulkarni

Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) नुकतंच पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कधीच न साकारण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच्या मुलाच्या नावावरून होणाऱ्या ट्रोलिंगबाबत होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हा निर्णय घेतल्याचं त्याने जाहीर केलं. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते नाराज झाले तर सेलिब्रिटीजनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ट्रोलर्सवरील त्यांची नाराजी जाहीर केली. दिग्दर्शक, गायक अवधूत गुप्तेनं (Avadhoot Gupte) सुद्धा चिन्मयसाठी एक खास पत्र लिहिलं आहे.

अवधूत गुप्तेचं चिन्मयला पत्र

पत्रामध्ये अवधूत गुप्तेनं लिहिलं, "चिन्मय... मित्रा! तुझी पोस्ट आणि त्याबद्दलची चर्चा वाचून वाईट देखील वाटलं आणि काळजी देखील. म्हणून तुला फोन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, तू फोन बंद करून बसलेला दिसतोस. तर, आता इथेच समजूत काढावी लागणार... कुठल्या भूमिका कराव्यात आणि कुठल्या करणे थांबवावे, हा सर्वस्वी कलाकाराचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे, तुझा निर्णय मान्य आहे. परंतु, ज्या कारणामुळे तू हा निर्णय घेतला आहेस, ते खूप दुर्दैवी आहे! ‘झेंडा‘ आणि ‘मोरया‘ च्या वेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून वाघा सारखा उभा राहिलेला चिन्मय हाच का?"

"मित्रा, तुला ट्रोल करणाऱ्या लोकांना ‘स्थळ, काळ आणि वेळ‘ सांगून बोलांव एखाद्या ठिकाणी.. आणि त्यातली पाच माणसं जरी आली, तरी त्यांचा सत्कार करून तुझा निर्णय पुढे ने. टाईमपासला टॉयलेट सीटवर बसून केलेल्या निर्बुद्ध कमेंट्सवर आपल्या करिअरचे महत्त्वपूर्ण निर्णय अवलंबून ठेवणे हे शहाणपणाचे आहे का? बाकी.. तुझा मनस्ताप मी समजू शकतो. काळजी घे. लवकरच भेटू-तुझा अवधूत गुप्ते. असं म्हणत त्यांनी चिन्मयची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. चिन्मयचा मुलगा जहांगीरच्या नावावरून बऱ्याच काळापासून त्याला ट्रोल केलं जातंय. चिन्मयची पत्नी नेहाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली. पण तरीही ट्रोलिंग न थांबल्यामुळे अखेर चिन्मयने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तो यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही हे जाहीर केलं.", असंही अवधुतनं लिहिलं आहे.

काय म्हणाला चिन्मय?

"नमस्कार, माझं नाव चिन्मय मांडलेकर. व्यवसायाने मी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे. काल माझी पत्नी नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो व्हिडीओ माझ्या मुलाच्या जहांगीर या नावामुळे होणाऱ्या ट्रोलिंगबद्दलचा आहे. माझ्या कुटुंबाबद्दल अतिशय घाणेरड्या आणि अश्लाघ्य कमेंट्स पास केल्या जात आहेत. माझ्या पत्नीनं व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर देखील लोक कमेंट्स करत आहेत. आता लोकं मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चारित्र्यापर्यंत सगळ्यावर शंका घेऊ लागलेत. एक व्यक्ती म्हणून मला या गोष्टीचा खूप त्रास होत आहे. मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो आतापर्यंत सहा चित्रपटांमध्ये मी ती भूमिका केली आणि तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का? असा या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे. कारण माझ्या मुलाचा जन्म २०१३ साली झालाय. आज तो ११ वर्षाचा आहे आणि हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. हे आता होतंय. मला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेने आतापर्यंत खूप काही दिलं. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील, देशाबाहेरील लाखो लोकांचं प्रेम मिळालं. फक्त मराठीच नाही तर अमराठी लोकांचंही प्रेम मिळालं. पण आता अशा ट्रोलिंगमुळे माझ्या कुटूंबाला जर अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक हे सांगू इच्छितो कि मी ही भूमिका करणार नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचात निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT