Chinmayee Sumeet Esakal
Premier

Chinmayee Sumeet : सिनेविश्व नाही तर चिन्मयी आणि सुमितच्या मुलाने निवडलं 'हे' क्षेत्र

Chinmayee Sumeet's son working in this field : सेलिब्रिटी जोडी चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांच्या मुलाने अभिनयक्षेत्र न निवडता करिअरसाठी वेगळं क्षेत्र निवडलं.

सकाळ डिजिटल टीम

Chinmayee Sumeet : सध्या अनेक सेलिब्रिटीजची मुलं आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेविश्वात पदार्पण करत आहेत. यात बॉलिवूडबरोबर मराठी इंडस्ट्रीही मागे नाही. पण काही स्टारकिड्सनी मात्र स्वतःसाठी करिअरची वेगळी वाट निवडली. सध्या अशाच एका स्टार किडची चर्चा होतेय ज्याने अभिनयक्षेत्रात प्रवेश न करता संगीतक्षेत्रात नशीब आजमावायचं ठरवलं. हा स्टारकिड आहे चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन यांचा मुलगा निरध.

लेकाबद्दल चिन्मयी सुमित झाल्या व्यक्त

नुकतंच इट्स मज्जा या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये चिन्मयी सुमित त्यांच्या लेकाबद्दल व्यक्त झाल्या. निरधला संगीतक्षेत्राची आवड असून त्याने त्याच क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्या म्हणाल्या कि,"निरधला तो खूप लहान असल्यापासूनच अनेक सिनेमांच्या आणि मॉडेलिंगच्या ऑफर्स येत होत्या कारण त्याची उंची छान आहे. आताही तो ६ फूट ४ इंचाचा मुलगा आहे. त्यामुळे त्याला इंडस्ट्रीत कामासाठी खूप ऑफर्स येत होत्या. म्हणजे जून पिक्चरचं काम सुरु होतं. तेव्हा त्याला विचारण्यात आलेलं 'तू या सिनेमात काम करशील का ?' पहिल्यांदा म्हणाला 'मी विचार करून सांगतो.' मग आमच्याशी बोलला. नंतर तिसऱ्या दिवशी आम्हाला म्हणाला 'नाही, अम्मा अप्पू मला नाही वाटत करावसं.'

त्यामागचं कारण जेव्हा आम्ही त्याला विचारलं त्यावर तो म्हणाला - कसं आहे कि मी काहीही काम केलं म्हणजे जर मी चांगलं काम केलं तर म्हणणार सुमित चिन्मयीचा मुलगा आहे चांगलं काम करणारच ! वाईट काम केलं तर म्हणणार चिन्मयीचा मुलगा असून इतकं वाईट काम केलं, म्हणजे मी काय काम करतो याची काहीही किंमत नसणार सतत तुलना होत राहणार आणि ती खूप मोठी. मला म्युझिकची आवड आहे. मला त्यात काहीतरी करायचंय. मला मॉडेलिंग आणि अभिनयातून खूप पैसे मिळाले तर माझा म्युझिकमधला फोकस जाईल तो मला जाऊ द्यायचा नाहीये. असं त्याने सांगितलं. त्यामुळे त्याने सिनेमाच्या ऑफर्सना नकार दिला."

इतकंच नाही तर चिन्मयी यांनी मुलाखतीमध्ये हे ही शेअर केलं कि, निरधने त्यांच्या एका मैत्रिणीच्या कपड्याच्या ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं तेही ती त्याची मावशी आहे म्हणून केलं पण त्यानंतर त्याला आलेल्या ऑफर्स त्याने नाकारल्या.

निरध सध्या संगीतक्षेत्रात काम करत असून त्याचा स्वतःचा म्युझिक बँड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजार वाढीसह उघडला; निफ्टी 80 अंकांनी वधारला, कोणत्या शेअर्समध्ये तेजी?

IND vs AUS : रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर निवृत्ती घेणार? BCCI ने स्पष्ट केली भूमिका; ही त्यांची शेवटची मालिका...

Zilla Parishad Politics : जिल्हा परिषदेसाठी कायपण! ‘सरकार’, ९६ कुळी, म्हणून घेणारे होणार ‘कुणबी’; स्वतःसह सौभाग्यवतींचेही काढले दाखले

Missing Lawyer Case : तीन महिन्यांपासून वकील बेपत्ता, शिंदे गटाच्या 'या' आमदारावर गंभीर आरोप; किशोरी आरडे म्हणाल्या, 'माझ्या पतीच्या जीवाला..'

Latest Marathi News Live Update : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणासंदर्भात एसआयटी/सीआयडीने अटक केलेल्या श्यामकानु महंता, सिद्धार्थ शर्मा आणि इतरांना आज न्यायालयात हजर करणार

SCROLL FOR NEXT