Bhagya Dile Tu Mala Serial  esakal
Premier

Bhagya Dile Tu Mala Serial : कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची ‘ही’ लाडकी मालिका घेणार निरोप

कलर्स मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

कलर्स मराठीवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेची चर्चा सगळीकडे सुरु आहे. स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. या नव्या मालिकेमुळे आता कलर्स मराठीवरील कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याच्या चर्चा बराच काळ रंगल्या होत्या. अखेर या बाबतीतील महत्त्वाची बातमी समोर आलीये.

कलर्स मराठीवरील सगळ्यांची लाडकी मालिका 'भाग्य दिले तू मला' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तन्वी मुंडले, विवेक सांगळे आणि निवेदिता सराफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचा शेवटचा भाग येत्या आठवड्यात प्रसारित होईल. काही दिवसांपूर्वीच या मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.

गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीमध्ये घसरण झाल्यामुळे ही मालिका बंद होत असावी असा प्रेक्षकांचा अंदाज आहे. पण याबाबत अजून कलर्स मराठी चॅनेलने कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण दिलं नाहीये. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री शिवानी सोनाराची मुख्य भूमिका असलेल्या सिंधुताई माझी माई या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्या जागी इंद्रायणी ही नवी मालिका सुरु झाली आहे.

तर आता कलर्स मराठी वाहिनीवर दोन नवीन शोज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्पृहा आणि सागर यांची मुख्य भूमिका असलेली सुख कळले ही मालिका रात्री ११ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल तर डॉ. निलेश साबळेंचा हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम शनिवार आणि रविवारी रात्री ९:०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामुळे रात्री ९ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘रमा राघव’ या मालिकेची वेळ बदलून आता रात्री ९:३० अशी करण्यात येणार आहे.

‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका कन्नड मालिका 'कन्नदती’ या मालिकेचा रिमेक होती. विवेक, निवेदिता आणि तन्वी यांच्या अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. २०२२ मध्ये या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता आणि आता दोन वर्षाने ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. सध्या मालिकेत राज आणि कावेरी यांना त्यांची कंपनी ‘माहेरचा चहा’ परत मिळाल्याचं दाखवण्यात आलं तर त्यांचं राहत घरसुद्धा परत मिळणार असून राज कावेरीच्या घरी चिमुकला पाहुणा येणार आहे. मालिकेचा शेवट गोड दाखवून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT