Dance Deewane 4 sakal
Premier

Dance Deewane 4 Winner: गौरव आणि नितीन ठरले 'डान्स दिवाने 4' चे विजेते; ट्रॉफीसह मिळाले इतक्या लाखांचे बक्षीस

22 वर्षांचा गौरव जहान हा दिल्लीचा तर 19 वर्षांचा नितीन बेंगळुरूचा आहे.

priyanka kulkarni

Dance Deewane 4: छोट्या पडद्यावरील 'डान्स दिवाने 4' (Dance Deewane 4) या रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले पार पडला आहे. गौरव शर्मा (Gaurav Sharma) आणि नितीन एनजे (Nitin NJ) यांनी हा रिअॅलिटी शो जिंकला आहे. दोघांना बक्षीस म्हणून 20 लाख रुपये मिळाले आहेत. 22 वर्षांचा गौरव जहान हा दिल्लीचा तर 19 वर्षांचा नितीन बेंगळुरूचा आहे. गौरव आणि नितीन हे जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेचा वापर ते कसा करणार आहे? शोमधील अनुभव याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

गौरव आणि नितीन जिंकलेल्या रकमेचा कसा करणार वापर?

गौरव शर्मा आणि नितीन हे दोघे 'डान्स दिवाने 4' या कार्यक्रमाची ट्रॉफी जिंकल्यानंतर खूप आनंदी झाले. गौरव आणि नितीन यांना ट्रॉफीसोबतच 20 लाखांचे बक्षीस देखील मिळाले आहे. अशातच गौरव आणि नितीन यांनी सांगितलं की, ते दोघे बक्षिसाची रक्कम अर्धी वाटून घेणार आहेत. ट्रॉफी जिंकल्यानंतर गौरव आणि नितीन यांनी ETimes शी बोलताना बक्षीसाच्या रकमेचे काय करणार हे सांगितले. जिंकलेली रक्कम नितीन हा त्याच्या पालकांना देणार आहे. तर त्यामधील काही रक्कम तो धर्मादाय कार्यासाठी देणार आहे.

गौरव म्हणाला, 'माझी स्वप्ने वेगळी आहेत. मी माझ्या मैत्रिणीसोबत फिरायला जाणार आहे. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कर्ज घेतले होते, त्यामुळे त्यांचे कर्ज मी फेडणार आहे. माझी दुसरी इच्छा एक छोटी कार घेण्याची आहे."

गौरव आणि नितीन, युवराज आणि युवंश, चिराश्री आणि चैनवीर, श्रीरंग आणि वर्षा, दिव्यांश आणि हर्ष, काशवी आणि तरनजोत यांच्यासोबतच या शोच्या ग्रँड फिनालेमध्येही पोहोचले होते. पण डान्स दिवानेच्या या सीझनची ट्रॉफी गौरव आणि नितीन यांनी जिंकली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: बाजारात तेजी कायम! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; तिमाही निकालांमुळे ‘या’ शेअरवर सर्वांची नजर

Maharashtra U-17 Girls Cricket: ईश्वरी अवसरेचा धडाका! १२४ धावांची वादळी खेळी, महाराष्ट्राचा गुजरातवर दमदार विजय

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

'दुचाकीवर स्वामी अन्...' देऊळ बंद २ चं पहिलं मोशन पोस्टर रिलीज, स्नेहल तरडेच्या डोळ्यात अश्रू, काय असेल कथा?

इथली जागा मुडदे गाडणारी, बेचैन आत्म्यांमुळे ग्रहण; चांगल्या जागेवर इमारत बांधा, शिंदेंच्या मंत्र्याचा महापालिकेला सल्ला

SCROLL FOR NEXT