Jackie Shroff about Danny Denzongpa esakal
Premier

जॅकी श्रॉफला भेटण्यासाठी चाळीतल्या घरी गेलेले डॅनी, गर्दी हटवण्यासाठी टॉवेलवरच बाहेर आलेला अभिनेता, वाचा तो किस्सा

Jackie Shroff About Danny Denzongpa : लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते डॅनी डेन्झोंग्पा आणि अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या मैत्रीच्या दिवसातील काही आठवणी शेअर केल्या आहेत.

Payal Naik

Friendship Day Special: आज ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातोय. बॉलिवूडमध्येही असे अनेक कलाकार सांगता येतील जे एकमेकांचे अगदी जिवलग मित्र आहेत. अनेक वर्ष हे कलाकार आपली मैत्री जपत आहेत. अशीच एक जिवलग मित्रांची जोडी म्हणजे जॅकी श्रॉफ आणि डॅनी डॅनी डेन्झोंग्पा. या वयातसुद्धा ते दोघे आपली मैत्री जपत आहेत. कधी जॅकी डॅनीला भेटायला सिक्कीमला जातो तर कधी डॅनी त्याला भेटायला मुंबईला येतात. ते दोघे मिळून खूप फिरतात. ट्रिप काढतात. त्यांची पहिली भेट जॅकीच्या पहिल्या चित्रपटाच्या सेटवर म्हणजेच 'हिरो'च्या सेटवर झाली होती. आता मैत्रीदिनानिमित्त दिलेल्या मुलाखतीत डॅनी यांनी त्यांचा एक जुना किस्सा सांगितला आहे.

हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा डॅनी जॅकीला भेटायला चाळीत गेले होते. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत डॅनी म्हणाले, 'मी त्याला हिरोच्या सेटवर पहिल्यांदा पाहिलं. तो चित्रपट हिट झाला आणि मी त्याला भेटायला त्याच्या मुंबईतल्या तीन बत्ती चाळीत गेलो. मी तेव्हा लोकप्रिय झालो होतो त्यामुळे मी जॅकीला भेटायला गेलो पण मलाच बघायला खूप गर्दी झाली. माझ्याबाजूला खूप लोक जमा झाले. तेव्हा जॅकी त्याच्या घरातून शर्ट शिवाय फक्त टॉवेलवर बाहेर आला. त्या माणसांना तो बाजूला करत होता. तो एकदम दादा, भाई सारखा वागत होता. मला येऊ बघून खूप आश्चर्य वाटलं की तो तिथे एका वन रूम किचनमध्ये राहत होता.'

डॅनी पुढे म्हणाले, 'त्याचा चित्रपट खूप हिट झालेला. तरीही तो तिथेच राहत होता. तो तिथून जाऊ शकत होता. मी त्याच्या आईला भेटलो. त्याच्या गर्लफ्रेंडलाही भेटलो जी आता त्याची पत्नी आहे आयेशा. ती आता माझी बहीण आहे. ती मला राखी बांधते. आमच्यात फिरणं आणि कुकिंग या दोन गोष्टी समान आहेत. आमचं निसर्गावर प्रेम आहे. आधी एक फुल लावायचं माहीत नसणारा जॅकी आता मला बगीचा कसा फुलवायचा यावर भाषण देतो.' डॅनी सध्या ७६ वर्षांचे आहेत तर जॅकी यांचं वाया ६७ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Youth Couple End Of Life : प्रियकराचा मेसेज "धरणावर भेटायला ये", 'ती'ही तातडीने भेटायला गेली अन् दोघांनीही धरणात घेतली उडी; हरवलेल्या मोबाईलमध्ये नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : कोर्टात सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्यामुळे बच्चू कडू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी

धक्कादायक घटना! 'साेलापुरात आमच्या ग्रुपमध्ये सहभागी हो म्हणून सपासप वार'; १८ जणांपैकी तिघांना अटक, काय घडलं ?

Goa Nightclub Fire Update : लुथरा बंधू थायलंडमधून पळून जाऊ शकणार नाहीत, भारत सरकारने रद्द केला पासपोर्ट

Koyna Earthquake: कोयनेतील ‘त्या’ काळरात्रीला ५८ वर्षे पूर्ण! 'भूकंपाच्या आठवणी आजही कायम'; निसर्गाच्या उद्रेकामुळे शेकडोंनी गमावले होते प्राण..

SCROLL FOR NEXT