deadpool and wolverine marathi trailer  sakal
Premier

मराठमोळ्या शिव्या आणि गुलाबी साडी; 'डेडपूल अँड वूल्व्हरिन' चित्रपटाच्या मराठी ट्रेलरचा धुमाकूळ, डायलॉग ऐकलेत का?

deadpool and wolverine Marathi Trailer: 'डेडपूल अँड वूल्व्हरिन' या हॉलिवूड चित्रपटाचा ट्रेलर मराठी भाषेतदेखील प्रदर्शित झाला आहे.

Payal Naik

मार्वल स्टुडिओजच्या बहुप्रतिक्षित ॲक्शन चित्रपट "डेडपूल अँड वूल्व्हरिन" ने देशभरात खळबळ उडवली आहे. येत्या २६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षक आतुरतेने त्याची वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, विशेष म्हणजे भारतातील विविध भाषांमध्ये रिलिज करण्यात आला आहे, त्यात मराठीचाही समावेश आहे. मराठी ट्रेलरने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. डेडपूल आणि वूल्व्हरिन मराठीत काय बोलले असतील, याबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरु आहे.

या मराठी ट्रेलरने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. ट्रेलरमधील मराठी भाषा ऐकून प्रेक्षक फिदा झाले आहेत. ट्रेलरमध्ये भलेही दुहेरी अर्थाचे डायलॉग आणि शिव्या आहेत तरीही या ट्रेलरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या ट्रेलरमधील डायलॉग ऐकून प्रेक्षक चित्रपटाच्या मराठी व्हर्जनची मागणी करत आहेत. ट्रेलर हिंदी, गुजराती आणि इतर भाषांमध्येही उपलब्ध आहे. मात्र, हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये शिव्या आणि गुलाबी साडी यांचा उल्लेख आहे, ज्यामुळे प्रेक्षक आकर्षित झाले आहेत.

"डेडपूल अँड वूल्व्हरिन" हा या वर्षातील सर्वाधिक अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. रायन रेनॉल्ड्स पुन्हा एकदा वेड विल्सनच्या भूमिकेत दिसणार असून, ह्यू जॅकमन वूल्व्हरिनच्या भूमिकेत आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी या चित्रपटाचे ॲडवान्स बुकिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट २६ जुलै २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शॉन लेव्ही यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

ISRO: 'इस्रो'कडून होतेय ४० मजली उंचीच्या यानाची निर्मिती; अध्यक्ष व्ही. नारायण यांनी दिली सखोल माहिती

Georai Crime : 'त्या' मायलेकीच्या मृत्यूचे कारण आले समोर; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, पतीला अटक

Maharashtra Heavy Rain Update : मुसळधार पावसाचा फटका! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, शाळा- कॉलेज बंद, पण कुठे?

Mumbai Rain Update: मुंबईकरांनो सतर्क राहा! पावसाचा जोर वाढणार, आयएमडीचा अंदाज

SCROLL FOR NEXT