Deepika Padukone esakal
Premier

Deepika Padukone: दीपिकाने शेअर केले बेबीमूनचा फोटो, मानेवरच्या टॅटूने वेधलं लक्ष

Deepika Padukone: नुकतंच रणवीर आणि दीपिका एका छोट्याशा व्हेकेशनवरून परतले आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

priyanka kulkarni

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोणविषयी (Deepika Padukone) अपडेट्स जाणून घेण्यास तिचे चाहते सतत उत्सुक असतात. लवकरच आई होणार असल्यामुळे दीपिका सध्या जास्तीत जास्त वेळ स्वतःसोबत स्पेंड करतेय. नुकतंच रणवीर आणि दीपिका एका छोट्याशा व्हेकेशनवरून परतले आहेत. तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दीपिकाच्या मानेवरच्या टॅटूनं वेधलं लक्ष

दीपिकाने सोशल मीडियावर तिचा पाठमोरा शेअर केला असून तिच्या पाठीवरचं बेबीमून टॅन या फोटोमध्ये दिसतंय. तिने या फोटोच्या कॅप्शन मध्ये नवरा रणवीर सिंगला टॅग करत बीच आणि लाटांचे ईमोजी शेअर केले आहेत. रणवीरने या फोटोवर "मला पुन्हा त्या हळू चालणाऱ्या जगात घेऊन जा" अशी कमेंट केली. तर दीपिकाच्या मानेवरच्या टॅटूने सुद्धा लक्ष वेधून घेतलं. दीपिकाच्या मानेवर तिचा पुर्वश्रमीचा प्रियकर रणबीर कपूरच्या नावाचा 'RK' असं गोंदलेला टॅटू होता. हा टॅटू आता तिने मिटवला असल्याचं या फोटोतून लक्षात येतंय. तिने तिचा हा टॅटू लेझर ट्रीटमेंटने मिटवल्याचं म्हंटल जातंय.

दीपिकाच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत तिला टॅन मिटवण्याचा टिप्स दिल्या. काहींनी तिला 'सनस्क्रीन का लावलं नाहीस?' असा प्रश्न केला. तर काहींनी तिला टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय सांगितले. अनेकांनी तिला काळजी घ्यायला सांगितली.

सप्टेंबरमध्ये दीपिका आणि रणवीरच्या बाळाचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट शेअर करत बाळाच्या आगमनाची घोषणा केली. या आधीही रणवीरने बाळाविषयीचा त्याचा उत्साह अनेक मुलाखतींमध्ये शेअर केलाय. अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सोहळ्यातसुद्धा हे दोघे उत्साहाने सहभागी झाले होते.

आगामी प्रोजेक्ट्स

रणवीर आणि दीपिका आता सिंघम अगेन या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. तसेच ती कल्की २८९८ एडी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही या सिनेमात भूमिका आहेत. तर रणवीरसुद्धा डॉन ३ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फरहान अख्तर या सिनेमाची निर्मिती करतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT