Deepika Padukone  esakal
Premier

Deepika Padukone: 'मॉम टू बी' दीपिका सिंघम अगेनच्या शूटिंगमध्ये व्यस्त; बेबी बंपने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं

Deepika Padukone: दीपिका प्रेग्नेंसीमध्येही सिनेमाचं शूटिंग पूर्ण करत असून नुकतंच सोशल मीडियावर तिचे शूटिंगदरम्यानचे बिहाइंड द सीन फोटो व्हायरल झाले आहेत.

priyanka kulkarni

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) ती प्रेग्नेंट असल्याची बातमी उघड केल्यापासून गेले काही महिने चर्चेत आहे. दीपिका सोशल मीडियावर शेअर करत असलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांची नजर असून तिच्याविषयीचे अपडेट्स जाणून घेण्याबाबत ते खूप उत्सुक आहेत. दीपिका प्रेग्नेंसीमध्येही सिनेमाचं शूटिंग पूर्ण करत असून नुकतंच सोशल मीडियावर तिचे शूटिंगदरम्यानचे बिहाइंड द सीन फोटोज व्हायरल झाले.

झूम टीव्ही चॅनेलने त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर दीपिकाचे सिंग अगेन सिनेमाच्या सेटवरील फोटोज शेअर केले. या फोटोमध्ये दीपिका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या वेशात दिसतेय. या फोटोजवरून एखादा ऍक्शन सिक्वेन्स शूट होत असावा असा अंदाज येतोय. दीपिकाचा लूक सोशल मीडियावरही सगळ्यांना पसंत पडला असून अनेकांनी कमेंट करत तिला पोलिसांची वर्दी शोभून दिसतेय अशा कमेंट्स केल्या आहेत. तर या फोटोमध्ये दीपिकाचे ऍक्शन सिक्वेन्स करणारी बॉडी डबलही पाहायला मिळतेय. यावरून प्रेग्नेंसीमुळे दीपिका ऍक्शन सीन स्वतः शूट करणार नाही हे स्पष्ट होतंय.

दीपिकाचा बेबी बंप आता दिसत असून तो लपवण्यासाठी थोडेसे सैल कपडे तिने घातल्याचं लक्षात येतंय. नेटकऱ्यांनी याबाबत सोशल मिडीयावर कमेंट्स करत या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं.

दीपिका 'सिंघम अगेन' या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून तिच्यासोबत रणवीर सिंग, अक्षय कुमार, अजय देवगण, करिना कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या वर्षाअखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचं म्हंटलं जातंय. सूर्यवंशी सिनेमात दाखवण्यात आलेल्या कथानकाचा पुढचा भाग या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे.

या सिनेमाचं शूट पूर्ण करून दीपिका काही काळासाठी शुटिंगमधून ब्रेक घेणार असल्याचं म्हंटलं जातंय. तर येत्या मे महिन्यात दीपिकाचा कल्की हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात ती प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. त्यांच्या बाळाची झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : नवले पुलावर अपघाताची मालिका थांबेना! पहाटे स्कूलबस कारला धडकली अन्...; Video समोर

भाजप आमदार करणार तुकाराम मुंढेंच्या निलंबनाची मागणी, नियमबाह्य काम केल्याचा आरोप

Indigo Flight Update : 'इंडिगो'चा माफिनामा, आजपासून विमानसेवा सुरळीत चालणार, कसं असेल वेळापत्रक...

Latest Marathi News Update : मध्यप्रदेशात १० नक्षलवाद्यांचेआत्मसमर्पण

Sakal Suhana Swasthyam : महाविद्या आपल्याच भावनांचे विश्‍व : सीमा आनंद

SCROLL FOR NEXT