esakal

Premier

Dharmendra Dream Unfulfilled : ‘’धर्मेंद्र यांचे ‘ते’ स्वप्न अर्धवटच राहिले...’’, हेमा मालिनींनी प्रार्थना सभेत केला खुलासा!

Hema Malini reveals Dharmendra’s unfulfilled dream : नवी दिल्लीत आयोजित प्रार्थना सभेत दिग्गज राजकारण्यासंह चित्रपटसृष्टीतील अनेकांची उपस्थिती होती.

Mayur Ratnaparkhe

Dharmendra tribute: हिंदी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. यानंतर आता त्यांच्यी पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री, खासदार हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासाठी नवी दिल्लीत प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. याप्रसंगी मनोरंजन आणि राजकीय जगतातील अनेक प्रमुख व्यक्तींनी उपस्थित राहून ज्येष्ठ अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली.

यामध्ये गृहमंत्री अमित शाह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि अभिनेत्रीपासून राजकारणी झालेल्या कंगना राणौत यांचा समावेश होता. याचबरोबर धर्मेंद्र यांच्या कन्या ईशा आणि अहाना यांचीही प्रार्थना सभेला उपस्थित होती. यावेळी  हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांचे एक अर्धवट राहिलेल्या स्वप्नाबद्दल सांगितले, यावेळी त्यांचे डोळे पाणवले होते.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या पतीबद्दल अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितले. दिल्लीत झालेल्या प्रार्थना सभेत, त्यांनी खुलासा केला की, धर्मेंद्र यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात उर्दूमध्ये शायरी लिहिण्यास सुरुवात केली होती आणि ती त्यांची नवीन आवड बनली होती.

एवढंच नाहीतर धर्मेंद्र यांची ही आवड पाहून हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना त्यांची शायरी पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याचा सल्ला दिला.  परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. प्रार्थना सभेत हेमा म्हणाल्या, "हे धर्मेंद्र यांचे अर्धवट काम राहिले, जे त्यांचे स्वप्न होते."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT