70th National Film Awards 2024 Esakal
Premier

70th National Film Awards 2024 : कोल्हापूरकर पठ्ठ्याला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार! कोण आहे सचिन सूर्यवंशी?

70th National Film Awards 2024 : सचिन सूर्यवंशी यांच्या वारसा या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कोण आहेत सचिन सूर्यवंशी ? काय आहे हा माहितीपट ? जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Marathi Entertainment News : नुकतंच 70व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि यामध्ये मराठी सिनेमानीही स्वतःचा ठसा उमटवला आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी यांचा वाळवी या सिनेमाला मराठी विभागातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. तर कोल्हापूरचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन बाळासाहेब सूर्यवंशी यांच्या वारसा या माहितीपटाला सांस्कृतिक चित्रपट या विभागात सर्वोत्कृष्ट माहितीपट हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

कोण आहेत सचिन सूर्यवंशी ?

मूळचे कोल्हापूरचे असलेले सचिन हे शेतकरी आणि फिल्ममेकरही आहेत. या आधी त्यांनी दर्शन, द सॉकर सिटी या शॉर्टफिल्मची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्या या दोन्ही शॉर्टफिल्म्सचं भरभरून कौतुक झालं होत. त्यानंतर त्यांनी वारसा या शिवकालीन मर्दानी खेळावर आधारित माहितीपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.

सिनेमाची गोष्ट

छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन सुरु झालेल्या मर्दानी खेळाचे स्वरूप आणि एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारा या खेळाचा वारसा याची गोष्ट या माहितीपटामध्ये सुंदररित्या दाखवण्यात आली आहे. त्यांच्या या माहितीपटाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली. त्यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली असून सर्वोत्कृष्ट कला / सांस्कृतिक चित्रपट या विभागात त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

फिल्मफेअरही पटकावला

या आधी सचिन यांना या माहितीपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. सर्व स्तरातून सचिन यांच्या मेहनतीचं कौतुक करण्यात आलं होतं. तर २ ० १ ९ साली आलेल्या 'द सॉकर सिटी' या शॉर्ट फिल्मही फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर त्यांना थेट राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना त्यांचा अभिमान वाटतोय. सचिन यांचा हा वारसा माहितीपट युट्युबवर उपलब्ध आहे.

पाहा वारसा :

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT