Mahesh Manjrekar talks about Savarkar biopic 
Premier

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Director Mahesh Manjrekar opens up about quitting Savarkar biopic : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाचं दिग्दर्शन का सोडलं याचं कारण स्पष्ट केलं. काय म्हणाले मांजरेकर जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Mahesh Manjrekar : बॉलिवूड स्टार रणदीप हुडाचं दिग्दर्शन आणि मुख्य भूमिका असलेला 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा सिनेमा बराच चर्चेत होता. सुरुवातीला या सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार होते पण मांजरेकरांनी हा सिनेमा अर्ध्यावरच सोडून दिला. पुढे रणदीपने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं.

नुकतंच महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांनी हा सिनेमा का सोडला याविषयी खुलासा केला.

महेश मांजरेकर यांनी 'जुनं फर्निचर' या सिनेमाच्या निमित्ताने लोकसत्ता डिजिटल अड्डा या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या सिनेमाचं दिग्दर्शन करणं का सोडलं? या प्रश्नाचं उत्तर दिलं.

ते म्हणाले,"सावरकर हा सिनेमा आता रिलीज झाला पण मी याविषयी बोलणं टाळत होतो. माझ्याविषयी खूप काही चर्चा होत होत्या. महेशने पिक्चर सोडला, महेश पळून गेला असं अनेकजण म्हणत होते. पण मी यावर कधीच बोललो नाही. मी रिअक्ट केलं तर या लोकांनाच प्रसिद्धी मिळेल आणि त्यांना तेच हवंय. मुळात सावरकर या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला खूप आकर्षण आहे. यांचं काहीही घेणं-देणं नाही ज्यांनी कुणी सिनेमा केलाय त्यांचा. मुळात या सिनेमाची संकल्पना माझी होती. त्यानंतर संदीप सिंह आणि आनंद पंडित निर्माते म्हणून माझ्याजवळ आले. मग आम्ही कलाकार शोधत असताना रणदीप हुडाची सावरकरांच्या भूमिकेसाठी निवड केली. "

पुढे मांजरेकर म्हणाले,"रणदीपला सावरकर यांच्याविषयी काहीच माहित नव्हतं पण त्याचं कौतुक असं कि त्याने त्यावेळेचा संपूर्ण इतिहास वाचून काढला. त्याने जेव्हा सुरुवात केली तेव्हा तो म्हणाला हे तर खलनायक आहेत पण मी त्याला म्हंटलं कि, त्यांच्या व्यक्तिमत्वात बरंच काही आहे. या सिनेमाचं ७०-७५% स्क्रिप्ट माझं आहे.त्यानंतर पहिलं वाचन झालं. पहिल्या वाचनाला त्याने बरेच सल्ले दिले. त्यानंतर त्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. त्याला त्या सिनेमात भगत सिंहही हवा होता, १८५७ च्या लढ्यातील व्यक्तिमत्त्वही हवी होती. काळ्या पाण्याच्या शिक्षेतील सावरकरांचा काळ त्याने खूप मोठा करून ठेवलाय. त्या शिक्षेचा प्रभाव दिसावा म्हणून दोन चांगले सीन पुरेसे आहेत पण त्यात त्याने खूप वेळ काढला. प्रत्येक गोष्टीत तो हस्तक्षेप करायचा. त्याला कधीही भेटायला गेलं तर तो सावरकरांचे कपडे घालून बसलेले असायचा आणि मला त्याच्यातल्या कलाकारांशी बोलायचं असायचं. मला शंका यायला लागली कि तो मुद्दाम करतोय कारण कदाचित त्याला हा सिनेमा दिग्दर्शित करायचा आहे. एकदा तर त्याने मला शॉर्ट कसा घ्यावा हेही सुचवलं. मग मी त्याला सांगितलं हे तू मला नाही सांगायचं. शेवटी मी कंटाळलो आणि निर्मात्यांना भेटलो. त्यांना सांगितलं कि एकतर त्याला हा सिनेमा करु देत किंवा मी करतो. कारण असं होत राहील तर मी कधीच हा सिनेमा पूर्ण करू शकणार नाही आणि म्हणून, मी तो सिनेमा सोडला. "

दरम्यान 'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू शकला नाही. जेमतेम चार आठवडे चाललेल्या या सिनेमा संपूर्ण जगभरात ३१.२३ करोड रुपये इतकी कमाई केली. या सिनेमात रणदीप व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अमित सियाल यांची मुख्य भूमिका होती तर या सिनेमाच्या मराठी व्हर्जनसाठी अभिनेता सुबोध भावेने सावरकरांच्या भमिकेसाठी डबिंग केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT