Aabhalmaya  esakal
Premier

मंदार देवस्थळींनी सांगितला 'आभाळमाया'चा सर्वोत्तम सीन, म्हणाले- रात्री ९ वाजता सुधीर घरी येतो आणि...

Abhalmaya Serial Best Scene : आभाळमाया या मालिकेची प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्यात दिग्दर्शकाने मालिकेचा सर्वोत्तम सीन सांगितला आहे.

Payal Naik

झी मराठी वाहिनीने अनेक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. झी मराठीवरील अनेक मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'आभाळमाया'. 'आभाळमाया' या मालिकेने अनेक वर्ष छोट्या पडद्यावर राज्य केलं. या मालिकेची लोकप्रियता प्रचंड होती. कथानक आणि कलाकार यांच्या जोरावर ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती. आजही ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा या मालिकेच्या आठवणी ताज्या करण्यात आल्या. या सोहळ्यात दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी या मालिकेमधील सर्वोत्कृष्ट सीन सांगितला.

झी मराठीने मंदार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात मंदार त्या सीनबद्दल सांगताना दिसतायत. ते म्हणतात, 'आभाळमायाचा सोनेरी क्षण म्हणजे मालिकेही ५३ आणि ५४ नंबरचा एपिसोड. जो विवेक सरांनीच लिहिला होता. रात्री ९ वाजता शरद जोशी घरी येतो आणि रात्री २ वाजता सुधा जोशी त्याला घराबाहेर काढते. ११ पानाचा १ सीन १ एपिसोड होता. दोन पात्र फक्त. मला वाटतं तो आमच्या सगळ्यांच्याच आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याची आठवण अशी की ३- ४ दिवस आधी आमच्याकडे स्क्रिप्ट आलं. विवेक सरांनी सीन वाचून दाखवला. आणि तो वाचल्यानंतर शप्पथ सांगतो खोटं नाही बोलत आहे. १५ मिनिटं कुणीच कुणाशी बोललं नाही. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं.'

abhalmaya scene

या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिलं, 'इतका प्रभावी सीन, पण कुठेही मोठ्या आवाजात पार्श्वसंगीत नाही, उगीच क्लोज अप ताणलेले संवाद नाहीत. म्हणूनच प्रभावी झाला असेल..जुन्या मालिका बघायला छान वाटण्याचं एक कारण ते आहे.' आणखी एकाने लिहिलं, 'खरंच खूप छान भाग होता तो. एकदम योग्य भावना होत्या.' अनेकांनी तर झी मराठीच्या जुन्या मालिका पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

५ हजार देशील तरच... अभिनेता सुशांत शेलारने खंडणी मागितली? मराठी उद्योजकाचा थेट आरोप; रेकॉर्डिंगही ऐकवली

Supreme Court on Bihar SIR Case : बिहार 'SIR' बाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! ‘आता आधार कार्ड....’

Latest Marathi News Updates : नांदगाव मतदारसंघाच्या आमदाराची पंजाबमधील आपत्तीग्रस्तांसाठी ९ लाख रुपयांची आर्थिक मदत

Hyderabad Gazette: हैदराबाद गॅझेट! बंजारा समाजाला आदिवासींचं आरक्षण कसं मिळेल? नेमका पुरावा काय सापडला?

PM Vidyalaxmi Yojana: टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय? मग सरकारकडून मिळवा 3% व्याज सवलतीचं शिक्षण कर्ज, जाणून घ्या अर्ज कसा करावा!

SCROLL FOR NEXT