Marathi Movie Poster: सोशल मीडियावर अनेक कलाकारांचे फोटो व्हायरल होत असतात. त्यांचे जुने किंवा बालपणाचे फोटोही सोशल मीडियावर फिरत राहतात. मात्र चाहते आपल्या लाडक्या कलाकाराला ओळखतात. आताही एका चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतंय ज्यात एक अभिनेता दिसतोय. मात्र कित्येक नेटकरी त्याला ओळखू शकलेले नाहीत. त्याचं कारण म्हणजे त्याचा जबरदस्त लूक. हा चित्रपट आहे 'सावंतांचं घर हेच का?' या चित्रपटाचं पोस्टर चाहत्यांमध्ये व्हायरल होतंय मात्र पहिल्या पाहण्यात या पोस्टरवर दिसणाऱ्या कलाकाराला नेटकरी ओळखू शकलेलं नाहीत. त्याचा लूक पाहून नेटकरी त्याच्या नावाचा अंदाज लावताना दिसत आहेत.
'सावंतांचं घर हेच का?' असं विचारणारा हा अभिनेता नेमका आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे. डोळ्यात बेधडकपणा, तोंडात सिगारेट, निर्विकार चेहरा, कानाला फोन विस्कटलेले केस अशा अवतारात या अभिनेत्याचा पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. जर पोस्टमध्ये आणि पोस्टरवर त्याचं नाव लिहिलं नसतं तर कदाचित त्याला ओळखायला सगळेच चुकले असते. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून संजय नार्वेकर आहे. त्याच्या या लूकने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. त्याचा हा पोस्टर चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. संजय 'सावंतांचं घर हेच का?' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या पोस्टरमध्ये बंदुकीने गोळी मारल्यावर होणारी खून दिसत आहेत त्यामुळे हा कदाचित क्राइम थ्रिलर चित्रपट असण्याची शक्यता आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्पृहा जोशी अभिनेत्यासोबत दिसणार आहे. चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल काहीही माहिती नसली तरी प्रेक्षक मात्र आपल्या लाडक्या कलाकारासाठी आनंदी आहेत. पुन्हा एकदा संजय यांचा एक वेगळा अवतार पाहायला मिळणार म्हणून चाहते खुश आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.