Dr shweta pendse Is Back In Threater sakal
Premier

Marathi Natak: ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री रंगभूमीवर पुन्हा करणार एंट्री, नाट्यरसिकांसाठी पर्वणी

A Perfect Murder Marathi Natak: गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे.

Chinmay Jagtap

Dr shweta pendse Is Back In Threater : गेल्या काही वर्षांपासून अभिनयापासून लांब असलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री रंगभूमीवर पुन्हा एंट्री करणार आहे. यामुळे नाट्यरसिकांसाठी ही एक पर्वणी असणार आहे.

आपल्या उत्तम आणि सयंत अभिनयाने डॉ. श्वेता पेंडसे हिने आजवर अनेक भूमिका सशक्तपणे पेलल्या आहेत.यातच आता डॉ. श्वेता पेंडसे यांनी रंगभूमीवर पुन्हा एंट्री घेतली आहे. 'अ परफेक्ट मर्डर’ या नाटकासाठी पेंडसे यांनी खाकी वर्दी चढवली आहे.

रहस्यांचा बादशहा आल्फ्रेड हिचकॉक याच्या एका मर्डर मिस्ट्रीचे मराठीत रूपांतर करत लेखक निरज शिरवईकर आणि दिग्दर्शक विजय केंकरे यांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाचा उत्तम पट रंगमंचावर मांडला आहे. बदामराजा प्रॉडक्शन्स संस्थेच्या या नाटकाचे निर्माते माधुरी गवांदे, निनाद कर्पे आहेत.

घटना-प्रसंगांतून निर्माण केलेले गूढ उकलताना केली जाणारी रहस्य आणि त्याची कल्पक मांडणी हे या नाटकाचं वैशिष्टय असून लवकरच या नाटकात अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे खाकी वर्दीत दिसणार असून तिच्या येण्याने नाटकाला कलाटणी मिळणार आहे. .

गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत या नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री डॉ.श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करते आहे.

‘सस्पेन्स थ्रीलर’ नाटक म्हटलं की कथेसोबत कलाकारांच्या अभिनयाचा कस असतो. माझ्यासाठी ही भूमिका तितकीच चॅलेंजिंग असल्याचे डॉ.श्वेता सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा घसरलं! उच्चांकापासून तब्बल ₹31,000 नी स्वस्त; आज महिन्यातील सर्वात कमी दर, काय आहे भाव?

Gokul Dudh Sangh Crisis : 'गोकुळ'वर प्रशासक नियुक्तीच्या कारवाईने मुश्रीफांना मोठा धक्का; भाजप-महाडिक गटासोबतचा दुरावा नडला!

Angaraki Sankashti Chaturthi 2026: श्रीगणेशाच्या कृपेने पूर्ण होतील सर्व मनोकामना; फक्त ‘या’ सोप्या पद्धतीने भरा इच्छापूर्ती कलश

"विराट भाऊ, मला कॉल कर!" भर मैदानात स्टंप उडवल्यानंतर आयशोस्पीडचा राडा; व्हिडिओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

Latest Marathi News Live Update : फाशी नाही ठेचून मारा, नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या पत्नीची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT