ek dav bhutacha  esakal
Premier

Ek Daav Bhootacha: 'दे धक्का' नंतर सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपूरे खेळणार 'एक डाव भुताचा'; चित्रपटाच्या पोस्टरने वेधलं लक्ष

Ek Daav Bhootacha Poster Release : संदीप मनोहर नवरे दिग्दर्शित 'एक डाव भुताचा' हा चित्रपट ४ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Payal Naik

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपूरे आणि सिद्धार्थ जाधव हे दोघेही अष्टपैलू अभिनेते आहेत. सोबतच ते विनोदवीर म्हणूनहीचाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे. 'दे धक्का' सारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. आता हे विनोदाचे महारथी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. 'एक डाव भूताचा' या नव्याकोऱ्या चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि सिद्धार्थ जाधव एकत्र दिसणार आहेत. येत्या ४ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आलं आहे.

सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपूरे एकत्र म्हणजे पुरेपूर मनोरंजनाची हमी हे त्यांनी आजवर अनेकदा दाखवून दिलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही त्याचंच प्रतिबिंब दिसतं. एकंदरीत चित्रपटाचे पोस्टर पाहता टॉम अँड जेरीसारखा खेळ या चित्रपटात पाहायला मिळण्याचा अंदाज बांधता येतो. त्यामुळे मकरंद आणि सिद्धार्थच्या दमदार अभिनयासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. रेवा इलेक्ट्रॉनिक्स या निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रस्तुती अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेंटेने केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केलं आहे.

चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांच्यासोत नागेश भोसले,अक्षय कुलकर्णी,हर्षद नायबळ अभिनेत्री मयूरी देशमुख,अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वैद्य, वर्षा दांदळे यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. डॉ. सुधीर निकम आणि संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा लेखन, डॉ. सुधीर निकम यांनी संवाद लेखन, गौरव पोंक्षे यांनी छायांकन, विक्रांत हिरनाईक यांनी गीतलेखन, गौरव चाटी यांनी संगीत दिग्दर्शन, प्रणव पटेल, मनु असाटी यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. सुप्रसिद्ध गायक सोनू निगम, अवधूत गुप्ते,रोहित राऊत आणि गायिका आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT