Ek Do Teen Chaar SAKAL
Premier

Ek Do Teen Chaar Teaser: सम्या-सायलीच्या क्युट लव्हस्टोरीत येणार ट्विस्ट; "एक दोन तीन चार"चा टीझर पाहिलात?

सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठा बॉम्ब फुटलाय.

priyanka kulkarni

Ek Do Teen Chaar: अनपेक्षित सरप्राईज नेहमीच धक्का देवून जातं, हे खरं मानता येईल कदाचित! कारण नुकताच "एक दोन तीन चार" (Ek Do Teen Chaar) या सिनेमाचा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यात सम्या आणि सायलीच्या क्युट लवस्टोरीत एक मोठा बॉम्ब फुटलाय. या जोडप्याच्या आयुष्यात एक अनोखा ट्विस्ट आला आहे, याची झलक "एक दोन तीन चार" या चित्रपटाच्या टीझरमध्ये बघायला मिळत आहे. आता हा हॅपिनेसचा बॉम्ब फुटल्यावर त्यांच्या आयुष्यात काय- काय घडणार आहे? हे आपल्याला येत्या 19 जुलै रोजी समजेल. कारण "एक दोन तीन चार" हा चित्रपट 19 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

"एक दोन तीन चार"ची स्टार कास्ट

"एक दोन तीन चार" या चित्रपटात मुख्य भूमिकेत वैदेही परशुरामी, निपुण धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर इ. कलाकर आहेत इतकच नव्हे तर ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मिडीया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.

"एक दोन तीन चार" या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहे की, सम्या आणि सायली यांच्या आयुष्यात लवकरच एका चिमुकल्याचं आगमन होणार आहे. ही बातमी जेव्हा सम्या आणि सायली यांच्या कुटुंबाला कळते, तेव्हा काय-काय घडतं, हे टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.

पाहा टीझर:

"एक दोन तीन चार"ची रिलीज डेट

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे निर्मित तसेच रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले निर्मीत बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांच्या साहाय्याने "एक दोन तीन चार" हा वरूण नार्वेकर दिग्दर्शित मराठी सिनेमा १९ जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT