Aadesh Bandekar SAKAL
Premier

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Lokshabha Elections: आदेश बांदेकर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

priyanka kulkarni

Lokshabha Elections 2024: पवईतील हिरानंदानी येथील मतदार केंद्राच्या बाहेर मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. या मतदान केंद्रामध्ये मतदान हे अतिशय धीम्या गतीनं सुरु आहे. अनेक नागरिक गेल्या तीन-चार तासांपासून मतदान केंद्राच्या बाहेर उभे आहेत. तसेच सिनेअभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) देखील लाईनमध्ये उभे होते. आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) हे मतदान करण्यासाठी जवळपासून तीन तास रांगेत उभे आहेत. या संपूर्ण घटनेवर आता आदेश बांदेकर यांनी एक व्हिडीओ शेअर करुन संताप व्यक्त केला आहे.

आदेश बांदेकर यांनी शेअर केला व्हिडीओ

आदेश बांदेकर यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आदेश बंदेकर आणि मतदान करण्यासाठी आलेले इतर नागरिक संताप व्यक्त करताना दिसत आहे. तसेच काही जेष्ठ नागरिक देखील मत देण्यात बराच वेळ उन्हात उभे राहिले आहेत, असंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आदेश बांदेकर म्हणतात, “मी आता पवई मतदान केंद्रावर आलो आहे. हिरानंदानी हा अतिशय सुशिक्षित विभाग आहे. याठिकाणच्या ५७, ५८ या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. तसेच येथील ईव्हीएम मशिन्स देखील बंद आहेत. हिरानंदानी फाऊंडेशन स्कूल याठिकाणचा हा प्रकार आहे. सकाळपासून सगळ्या मशिन याठिकाणी बंद आहेत. आम्ही एवढा वेळ उभे आहोत पण, कोणीच उत्तर देत नाहीये.”. आदेश बांदेकर यांच्यासोबतच सिने दिग्दर्शक केदार शिंदे यांनी देखील या गोष्टीबद्दल संताप व्यक्त केला. "कितीही उशीर झाला तरी मतदान करुनच जाऊ", असं त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT