Web Series Freedom At Midnight SAKAL
Premier

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' वेब सीरिजमध्ये सरोजिनी नायडू यांच्या भूमिकेत आरजे मलिष्का; 'हा' अभिनेता साकारणार व्हीपी मेनन यांची भूमिका

Web Series Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' या वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या वेब सीरिजमध्ये आरजे मलिष्का मेन्डोसा ही सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे

priyanka kulkarni

Star Cast Of Freedom At Midnight: सोनी लिव्‍ह आणि इमाय एंटरटेनमेन्टने ‘फ्रिडम अॅट मिडनाइट’ (Freedom At Midnight) या बहुप्रतिक्षित वेब सीरिजच्या कलाकारांच्या सूचीमध्ये आणखी काही नावांचा समावेश झाला आहे. या राजकीय थरारनाट्यामध्ये आरजे मलिष्का मेन्डोसा ही सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे, राजेश कुमार लियाकत अली खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे तर केसी शंकर व्ही.पी. मेनन यांची भूमिका साकारणार आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या काळामध्ये सरोजिनी नायडू, व्हीपी मेनन आणि लियाकत अली खान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सरोजिनी नायडू यांनी भारताच्या मुक्ततेचा पुरस्कार केला तसेच त्या आपल्या कवितांसाठी तसेच आंदोलनातील सहभागासाठीही ओळखल्या जातात. मेनन यांनी घटनात्मक सल्लागार म्हणून संस्थानांना स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्याच्या कामी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मुहम्मद अली जिना यांचे जवळचे सहकारी लियाकत हे फाळणीच्या वाटाघाटींमधील एक महत्त्वाचे नेते होते मात्र पंतप्रधान म्हणून त्यांना विदारक शेवटाला सामोरे जावे लागले. यातील प्रत्येक व्यक्तीमत्त्वाने भारत आणि पाकिस्तानच्या राजकीय पटलावर कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे.

सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारण्याविषयी मलिष्का म्हणाली, “फ्रिडम अॅट मिडनाइटमध्‍ये नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जाणा-या सरोजिनी नायडू यांची भूमिका साकारताना माझ्या मनात खरोखरीच विनम्रतेची भावना आहे. त्यांची भूमिका साकारणे हे एक आव्हान आहे आणि गौरवाची बाब आहे, ही भूमिका करण्यासाठी त्यांच्याविषयी वाचनात आलेल्या गोष्टी आणि मी त्यांच्याबद्दल आमच्या दिग्दर्शकाबरोबर केलेली चर्चा एवढेच संदर्भबिंदू माझ्याकडे आहेत. मला वाटतं त्या भारताच्या आधुनिक स्त्रीच्या ख-याखु-या प्रतिनिधी होत्या, ज्यांनी कोणत्याही मर्यादांच्या चौकटीत स्वत:ला अडकवून घेतलं नाही. त्या एक लोकप्रिय कवयित्री आणि स्वातंत्र्यसैनिक होत्याच पण त्याचबरोबर महिलांना राजकारणात येण्यासाठी मार्ग तयार करून देणा-या नेत्याही होत्या. त्यांच्या व्यक्तिमत्वातील गुंतागूंतीचा अधिक खोलात जाऊन वेध घेणे आणि आपल्या देशाच्या इतिहासातील इतक्या परिवर्तनशील कालखंडादरम्यान त्यांचा प्रवास समजून घेणे हे भारावून टाकणारे आहे. या मालिकेचा भाग बनणे म्हणजे इतिहासात मागे जाण्यासारखे व इतिहासाला त्याच्या सर्वाधिक नैसर्गिक रूपामध्ये अनुभवण्यासारखे आहे.”

‘फ्रिडम अॅट मिडनाइट’ या आगामी मालिकेसाठी लियाकत अली खान यांच्या भूमिकेची तयारी करताना राजेश शर्मा यांनी आपला अनुभव सांगितला. “लियाकत अली खान यांच्या व्यक्तिमत्त्वाशी समरस होणे हा माझ्या कारकिर्दीमधील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. त्यांचे आयुष्य, त्यांचे चालणे-बोलणे आणि त्यांची राजकारणातील कुशलता याविषयी केलेल्या प्रचंड संशोधन आणि तपशीलवार अभ्यासाच्या माध्यमातून पडद्यावर खान यांच्या अनेक बारीक छटा अससेले व्यक्तिमत्त्व अस्सलपणे उभे करणे हे माझे लक्ष्य आहे. माझ्या चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून मिळणा-या प्रतिक्रियांची मी आतुरतेने वाट पाहत आहे, कारण या थरारक राजकीय कथानकामध्ये माझ्या अभिनयाच्या वाटचालीतील हा एक महत्त्‍वपूर्ण टप्पा आहे.”

इमाय एंटरटेनमेन्टने (मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी) स्टुडिओनेक्स्ट आणि सोनी लिव्‍हच्या सफ्रीडम अॅट मिडनाइटची निर्मिती केली आहे व निखिल अडवानी या मालिकेचे शो रनर आणि दिग्दर्शक आहेत. अभिनंदन गुप्ता, अद्वि‍तीय कारंग दास, गुनदीप कौर, दिव्य निधी शर्मा, रेवंत साराभाई आणि इथन टेलर यांच्या लेखणीतून ही कहाणी साकारली आहे.

'फ्रिडम अॅट मिडनाइट'सह इतिहासाचा अभूतपूर्व अनुभव मिळवा, लवकरच येत आहे फक्त सोनी लिव्‍हवर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT