Salman's dance at Anant Ambani's Sangeet  Esakal
Premier

Anant & Radhika Sangeet : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला सलमानचा धमाकेदार परफॉर्मन्स ; स्टारकिड्सनीही केला डान्स

Salman Khan Dance At Anant & Radhika Sangeet Ceremony : अभिनेता सलमान खानने अनंत राधिकाच्या संगीत सोहळ्याला खास डान्स परफॉर्मन्स सादर केला.

सकाळ डिजिटल टीम

Salman Khan : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळ्याची तयारी गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु आहे. १२ जुलै २०२४ ला त्यांचा लग्नसोहळा पार पडणार असून काल ५ जुलैला त्यांचं संगीत थाटात पार पडलं. सोशल मीडियावर त्यांच्या संगीत सोहळ्याचे व्हिडीओ गाजतायत. अनंतच्या संगीत सोहळ्याला अभिनेता सलमान खानने हजेरी लावत डान्स परफॉर्मन्स सादर केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेत आहे.

सलमानचा धमाकेदार डान्स

अभिनेता सलमान खानने अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावत धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर केला. सलमानने अनंतबरोबर स्टेज शेअर करत त्याच्या अनेक गाण्यावर डान्स सादर केले. त्याने 2000 मध्ये आलेल्या 'हर दिल जो प्यार करेगा' या चित्रपटातील 'ऐसा पहली बार हुआ है' भन्नाट डान्स केला तर त्याच्या जस्ट चिल या गाण्यावर त्याच्याबरोबर स्टार किड्सही थिरकले.

सलमानने काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये संगीत सोहळ्याला हजेरी लावली. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेत होता. सलमानने राधिका-अनंतची भेट घेत त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.

रणवीर आणि दीपिकानेही केला डान्स

अभिनेता रणवीर कपूरनेही अनंत-राधिकाच्या डान्स सोहळ्याला डान्स केला. सिल्व्हर कलरचा हाफ स्लीव्हज व्हेस्ट, डेनिम आणि स्नीकर्स घालून त्याने डान्स केला होता. तर दीपिकाही काही वेळासाठी स्टेजवर हजर राहिली होती. या व्यतिरिक्त जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अर्जुन कपूर यांनीही स्टेजवर हजेरी लावत डान्स परफॉर्मन्स केले.

तर बॉलीवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्याला सादर केलेल्या पॉवर-पॅक परफॉर्मन्सने स्टेजला आग लावली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, रणबीर कपूर त्याच्या 'तू झुठी में मकर' या चित्रपटातील 'शो मी द ठुमका' या गाण्यावर आलियासोबत डान्स करताना दिसत आहे. नवऱ्याला डान्स मध्ये साथ देत आलियाने सुद्धा भन्नाट डान्स सादर केला.

१२ जुलै २०२४ ला पार पडणाऱ्या या लग्नसोहळ्याला देश-परदेशातून पाहुणे हजेरी लावणार असून मुंबईतील बीकेसीमधील जिओ कॉनव्होकेशन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT