Heeramandi web series budget is revealed 
Premier

Heeramandi The Diamond Bazar : ना सोनाक्षी ना मनीषा, 'या' व्यक्तीनं घेतलं सर्वाधिक मानधन; 'हिरामंडी' बजेट किती? जाणून घ्या

Heeramandi web series budget is revealed : संजय लीला भन्साळी यांच्या गाजलेल्या हिरामंडी या वेबसीरिजचं बजेट आणि कलाकारांचं मानधन अखेर समोर आलंय. कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतलं जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

Heeramandi The Diamond Bazar : भव्य सेट्स, दिव्यांचा झगमगाट, शाही अलंकार ही संजय लीला भन्साळी यांच्या प्रोजेक्टसची खासियत. त्यांचं दिग्दर्शन असलेली पहिली वेबसिरीज हिरामंडी द डायमंड बझार खूप चर्चेत आहे. सध्या सगळीकडे गाजत असलेल्या या वेबसीरिजसाठी कलाकारांनी घेतलेलं मानधन आणि या वेबसीरिजसाठी आलेला खर्च याविषयी जाणून घेऊया.

मनी कंट्रोल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, अतिशय भव्य दिव्य असलेल्या या वेबसीरिजसाठी संजय यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. सिनेमाचं कथानक, कलाकारांचे पोशाख हे सगळं चर्चेत आहेच पण यासोबतच या साठी कलाकारांनी घेतलेलं मानधनही सगळ्यांना चक्रावणारं आहे. खुद्द संजय यांनी ही वेबसीरिज दिग्दर्शित करण्यासाठी ६० ते ७० करोड रुपये इतकं मानधन घेतलं आहे. तर या वेबसीरिजसाठी संजय यांना तब्बल २०० करोड रुपये खर्च आहे.

कोणी घेतलं किती मानधन?

या वेबसीरिजमध्ये मल्लिकाजान ही भूमिका साकारणाऱ्या मनीषा कोईरालाने एक कोटी रुपये मानधन घेतलं आहे तर बिब्बोजान या भूमिकेमुळे सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या अदिती राव हैदरीने एक ते दीड कोटी रुपये मानधन घेतल्याचं म्हंटलं जातंय.

फक्त दोन एपिसोडमध्ये दिसलेल्या रिचा चड्ढाने तिला मिळविलेली लाजवंतीची भूमिका खूप तन्मयतेने साकारली. अतिशय हिट झालेल्या या भूमिकेसाठी रिचानेही एक कोटी मानधन फक्त दोन एपिसोडसाठी घेतल्याचा अंदाज आहे.

रेहाना आणि मल्लिकाजानची धाकटी बहीण वहिदाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री संजिदा शेखला ४० लाख रुपये मानधन देण्यात आलं आहे.

तर मल्लिकाजानच्या धाकट्या मुलीची आलमजेबची भूमिका साकारणाऱ्या शर्मिन सेहगलने ३० लाख रुपये मानधन घेतलं आहे.

सगळ्यात जास्त मानधन घेतलंय अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने. रेहाना आणि फरीदान ही भूमिका साकारणाऱ्या सोनाक्षीने दोन कोटी रुपये मानधन घेतलंय तर बऱ्याच काळाने बॉलिवूडमध्ये कमबॅक करणाऱ्या फरदीन खानने नवाब वली बिन झायेद-अल मोहम्मद या भूमिकेसाठी ७५ लाख रुपये मानधन घेतलं.

याशिवाय या सीरिजमध्ये कलाकारांनी वापरलेले दागिने अस्सल असल्याचं म्हंटलं जातंय. तर कलाकारांनी वापरलेले पोषाखही खास त्या काळानुसार डिझाईन करण्यात आले होते. सध्या वेबसीरिज नेटफ्लिक्सवर ट्रेंड करतेय. शेखर सुमन, अध्ययन सुमन, ताहा शाह बदुशा, फरीदा जलाल आणि श्रुती शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. परंतु या कलाकारांनी किती मानधन घेतलं त्याचा आकडा अजून समोर आला नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT