Maza Konkan Bhari sakal
Premier

Maza Konkan Bhari: निळ्याशार समुंदराची गाज...आमचो कोकण घालतोय तुम्हाला साद; 'घरत गणपती'मधील 'माझं कोकण भारी' गाणं रिलीज

Gharat Ganpati: 'घरत गणपती' या चित्रपटातील 'माझं कोकण भारी' हे गाणं पॅरानोमा म्युझिक या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे.

priyanka kulkarni

Maza Konkan Bhari: विविध विषयांवर आधारित असणारे मराठी चित्रपट गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच आता एका कुटुंबाची कथा मांडणाऱ्या 'घरत गणपती' (Gharat Ganpati) या चित्रपटाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. या टीझरला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. अशातच आता या चित्रपटातील एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात कोकणातील निळ्याशार समुद्राची दृष्ये दाखवण्यात आली आहेत.

'घरत गणपती' या चित्रपटातील 'माझं कोकण भारी' हे गाणं पॅरानोमा म्युझिक या युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात 'घरत गणपती' या चित्रपटातील कलाकारांची झलक बघायला मिळत आहे. तसेच गाण्यात कोकणातील समुद्र देखील दाखवण्यात आला आहे."निळ्याशार समुंदराची गाज...आमचो कोकण घालतोय तुम्हाला साद", असं कॅप्शन 'माझं कोकण भारी' या गाण्याला देण्यात आलं आहे.

श्रद्धा दळवी यांनी 'माझं कोकण भारी' हे गाणं लिहिलं आहे तर कोकण कलेक्टिव्हनं हे गाणं गायलं आहे.

कधी रिलीज होणार 'घरत गणपती'?

निकिता दत्ता, भूषण प्रधान, अजिंक्य देव, अश्विनी भावे, संजय मोने, शुभांगी लाटकर, शुभांगी गोखले, सुषमा देशपांडे, डॉ.शरद भुताडिया, समीर खांडेकर, आशिष पाथोडे, परी तेलंग, रुपेश बने हे कलाकार 'घरत गणपती' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 27 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Pension Yojana : मोदी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! अटल पेन्शन योजना २०३१ पर्यंत वाढवली; लाखो लोकांना मिळणार पेन्शन हमी

Ganesh Jayanti Marathi Wishes 2026: माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना पाठवा मराठीतून भक्तीमय शुभेच्छा, वाचा एकपेक्षा एक सुंदर संदेश

'रुबाब'च्या डॅशिंग लव्हस्टोरीचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; तरुणाईच्या स्वॅगदार प्रेमाची ठसकेबाज झलक

Raigad Video : 352 वर्षांपूर्वी कसे झालेले 'रायगड'चे बांधकाम? शिवरायांच्या काळातले अस्सल चित्र डोळ्यासमोर उभा करणारा AI व्हिडिओ व्हायरल

BMCच्या शाळांमधील सीबीएसईची पहिली तुकडी देणार दहावीची परीक्षा, ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT