Box Office Collection eSakal
Premier

Box Office Collection : 'क्रू' आणि 'दि गोट लाईफ' दोन्ही पडले मागे; सेकंड संडेला 'गॉडझिला'ची बंपर कमाई!

Godzilla x Kong : 'गॉडझिला x काँग' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.

Sudesh

Box Office Collection India : बॉक्स ऑफिसवर सध्या तीन सिनेमांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. हॉलिवूडचा 'गॉडझिला x काँग', बॉलिवूडचा 'क्रू' आणि 'आदुजीवितम : दि गोट लाईफ' असे हे तीन सिनेमे आहेत. या तिन्हीमध्ये हॉलिवूडचा गॉडझिला हा इतर दोन्ही चित्रपटांवर वरचढ ठरत असल्याचं दिसत आहे. रिलीजच्या दहाव्या दिवशी या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.

'गॉडझिला x काँग' (Godzilla x Kong: The New Empire) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 13.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये या सिनेमाने 57.75 कोटी रुपये कमावले. रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये देखील हा सिनेमा प्रेक्षकांना आपल्याकडे खेचत आहे. सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्टनुसार या सिनेमाने सेकंड संडेला भारतात 6.25 कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर या सिनेमाचं टोटल कलेक्शन 72.75 कोटी रुपये झालं आहे. (Godzilla x Cong India Collection)

क्रू किती भावतोय?

29 मार्च रोजी रिलीज झालेला 'क्रू' (Crew Box Office Collection) हा सिनेमा देखील दुसऱ्या आठवड्यात तग धरून आहे. करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सॅनॉन अशी तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी 9.25 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.

यानंतर पहिल्या आठवड्यात एकूण 43.75 कोटी रुपयांची कमाई या सिनेमाने केली. सेकंड संडेला या सिनेमाने भारतात 5.75 रुपयांची कमाई केल्याचा अहवाल सॅकनिल्कने दिला आहे. आतापर्यंत भारतात या सिनेमाने एकूण 58.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

आदुजीवितम

28 मार्च रोजी रिलीज झालेला 'आदुजीवितम : दि गोट लाईफ' हा मल्याळम सिनेमा क्रू आणि गॉडझिलाला चांगलीच टक्कर देत आहे. सुपरस्टार पृथ्वीराजच्या या सिनेमातील परफॉर्मन्सचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 7.6 कोटी रुपयांची कमाई केली होती.

पहिल्या आठवड्यामध्ये एकूण 47 कोटी रुपयांचा गल्ला या सिनेमाने जमवला. यानंतर रिलीजच्या 11व्या दिवशी, म्हणजे सेकंड संडेला या सिनेमाने 5 कोटी रुपये कमाई केल्याची माहिती सॅकनिल्कने दिली आहे. यानंतर या सिनेमाचं भारतातील टोटल कलेक्शन 58.60 कोटी रुपये झालं आहे. (The Goat Life Box Office Collection)

एकूणच, गेल्या शुक्रवारी नवे सिनेमे रिलीज होऊनही मागील आठवड्यात रिलीज झालेले हे चित्रपट अजूनही तग धरून आहेत. हळू-हळू हे तिन्ही चित्रपट 100 कोटी क्लबच्या दिशेने जात आहेत. हा संपूर्ण आठवडा हे सिनेमे चित्रपटगृहांमध्ये राहिल्यास हे लक्ष्य गाठणं शक्य होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! अनेक गाड्या रद्द होणार; पण कधी? रेल्वे प्रशासनाची महत्त्वाची माहिती

IPL 2026 Date Change : इंडियन प्रीमिअर लीग २६ मार्च ऐवजी 'या' तारखेला सुरू होणार; जाणून घ्या त्यामागचं महत्त्वाचं कारण...

Home Loan: ८ वर्षे EMI, ३ थकलेले हप्ते आणि ६० दिवस; १.२ कोटींचे घर गमावले: भारतीय स्वीकारण्यास नकार देत असलेले सर्वात कटू वास्तव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Shahu Mill Memorial : शाहू मिलचा स्मारक आराखडा लवकरच उच्चस्तरीय समितीकडे; राजेश क्षीरसागर यांनी आराखडा सादर करण्याचे दिले आदेश

SCROLL FOR NEXT