Bollywood actor Govinda injured in a suspected misfire accident with his licensed revolver. esakal
Premier

Govinda Misfire: अभिनेता गोविंदाच्या जबाबावर पोलीस असमाधानी, मिसफायरवर शंका... नेमके काय घडले?

Police Unsatisfied with Govinda’s Statement, Questions Surround the Misfire Incident: गोविंदाच्या मिसफायर प्रकरणावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. पोलिसांनी पुढील तपासणी सुरू केली असून, गोविंदाचा पुढील जबाब घेण्याची शक्यता आहे.

Sandip Kapde

मुंबई: बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या मिस फायर प्रकरणावर पोलिस अजूनही समाधानकारक उत्तर मिळवू शकलेले नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार, गोविंदाने दिलेल्या जबाबामुळे पोलिस अधिक साशंक झाले आहेत. त्याच्या जबाबात काही विरोधाभास असल्याचे दिसून आले असून, पोलिस त्याचे पुढील चौकशीसाठी तयारीत आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिस पुन्हा गोविंदाचा जबाब घेण्याची शक्यता आहे.

गोविंदाचा दावा आणि पोलिसांची शंका-

गोविंदाच्या मते, अपघात रिव्हॉल्व्हर हातातून पडल्याने झाला. गोविंदाच्या म्हणण्यानुसार, तो आपल्या लाइसेंसी रिव्हॉल्व्हरची सफर करत असताना, रिव्हॉल्व्हर हातातून सुटली आणि त्यातून गोळी निघाली, जी थेट त्याच्या पायात लागली. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता आणि त्यावेळी रिव्हॉल्व्हर अलमारीत ठेवताना हा अपघात घडल्याचा त्याचा दावा आहे. मात्र, पोलिसांनी यावर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. गोळी कशी निघाली आणि रिव्हॉल्व्हरचा लॉक का खुला होता, या मुद्द्यांवर अजून स्पष्टता आलेली नाही.

गोळी कधी आणि कशी निघाली?

मंगळवारी सकाळी 4:45 वाजता गोविंदा आपल्या जुहूतील निवासस्थानातून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. तो कोलकात्याला जाण्यासाठी फ्लाइट पकडणार होता, पण त्याचवेळी त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी निघाली आणि त्याच्या पायाला लागली. गोविंदाच्या मॅनेजरने सांगितले की, गोविंदा रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना ती हातातून सुटली आणि अपघात झाला. लगेचच त्याला उपचारासाठी नजीकच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये नेले गेले, जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करून गोळी काढण्यात आली.

पोलिसांची तपासणी आणि पुढील चौकशी

गोविंदाच्या घरातून गोळी लागल्याची बातमी मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची तपासणी केली आणि गोविंदाची रिव्हॉल्व्हर जप्त केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अजूनपर्यंत गोविंदा किंवा त्याच्या कुटुंबाने या प्रकरणावर कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. गोविंदा बॉलिवूडमधील प्रतिष्ठित अभिनेता असून, शिवसेनेचा सक्रिय नेता देखील आहे. काही काळापासून तो चित्रपटसृष्टीपासून दूर आहे, पण त्याच्या अपघाताने पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे.

पोलिस असमाधानी का?

पोलिसांनी या प्रकरणातील सर्व जबाब आणि पुरावे पाहिल्यानंतरही त्यांना गोविंदाच्या दाव्याविषयी काही शंका आहेत. विशेषत: रिव्हॉल्व्हरचा लॉक कसा उघडा होता आणि ती हातातून निसटल्यावर गोळी कशी निघाली, याचा तपास केला जात आहे. साम टिव्हीने याबाबत वृत्त दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Festival Toll Free: गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित! कोकण प्रवास भाविकांना टोल फ्री, पास मिळवण्याची प्रक्रिया काय? जाणून घ्या

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Maharashtra Latest News Update: तमिळनाडूत एनआयएचे छापे, रामलिंगम हत्याप्रकरणातील संशयिताला अटक

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

SCROLL FOR NEXT