Gulabi Sadi esakal
Premier

Gulabi Sadi: ज्या गाण्यावर धकधक गर्लही थिरकली ते 'गुलाबी साडी' गाणं कसं सुचलं? संजू राठोड म्हणतो...

Gulabi Sadi: मुलाखतीमध्ये संजूनं 'गुलाबी साडी; हे गाणं त्याला कसं सुचलं? हे सांगितलं आहे.

priyanka kulkarni

Gulabi Sadi Song: सोशल मीडियावर सध्या एक मराठी गाणं धुमाकूळ घालत आहे. "गुलाबी साडी" (Gulabi Sadi Song) हे गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील रिलमध्ये तुम्ही ऐकत असाल. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit Nene), रेमो डिसूजापासून (Remo D'Souza) ते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) टीममधील खेळडूंपर्यंत, अनेकांनी या गाण्यावर रिल्स तयार केले आहेत. या गाण्याचा गायक संजू राठोड हा सध्या चर्चेत आहे. नुकतीच संजू राठोडनं सकाळला एक विशेष मुलाखती दिली. या मुलाखतीमध्ये संजूनं 'गुलाबी साडी; हे गाणं त्याला कसं सुचलं? हे सांगितलं आहे.

गुलाबी साडी गाणं कसं सुचलं?

गुलाबी साडी हे गाणं कसं सुचलं असा प्रश्न विचारल्यावर संजूनं उत्तर दिलं, "गुलाबी साडी मी दिवाळीमध्ये लिहिलं होतं. प्रेमाचा रंग गुलाबी आहे आणि नऊवारी साडी हे गाणं माझं आधी आलं होतं. या दोन्ही गोष्टींना एकत्र करुन मी गुलाबी साडी गाणं तयार केलं. गाण्याच्या व्हिडीओमध्ये जो विषय तुम्ही पाहिला, त्या विषयाचा आधी मी विचार करत होतो. त्यानंतर मी गाणं लिहिलं."

माधुरी दीक्षितचं रिल पाहिल्यानंतर कशी होती संजूची रिअॅक्शन

'माधुरी दीक्षित यांचं गुलाबी साडी या गाण्यावरील पाहिल्यानंतर तुला कसं वाटलं?' असाही प्रश्न संजूला विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देतेना संजू म्हणाला, "मला त्यांचे रिल पाहिल्यानंतर खूप आनंद झाला. मी त्यांना लहानपणापासून बघत आलो आहे, त्यांच वय वाढतंय की नाही? असा प्रश्न त्यांच्याकडे बघून पडतो. त्यांनी माझ्या गाण्यावर रिल करणे हे माझ्यासाठी ब्लेसिंगसारखं आहे. मला खूप भारी वाटलं."

पाहा संपूर्ण मुलाखत:

सध्या संजूचं ब्राईड तुझी नवरी हे गाणं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या गाण्यातील अभिनेता नीतीश चव्हाण आणि नृत्यांगणा वैष्णवी पाटील यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor : मंदिरात काढली 'ऑपरेशन सिंदूर' ची रांगोळी; आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांवर गुन्हा दाखल

Pitru Paksha 2025: १०० वर्षांनी पुन्हा एकदा! पितृपक्षाचा दुर्लभ योग; जाणून घ्या काय आहे खास?

Ganpati Visarjan 2025 Live Updates : समुद्राला भरती आल्याने लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं

Latest Maharashtra News Live Updates: बीडच्या भरत खरसाडे यांच्या वडिलांना माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या फोन

Chandra Grahan 2025: आज होणारा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण, जाणून घ्या सुतक वेळ अन् 12 राशींवर होणारा परिणाम

SCROLL FOR NEXT